महाराष्ट्र

maharashtra

MPSC : विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; एमपीएससीचा नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू

By

Published : Feb 23, 2023, 5:55 PM IST

Updated : Feb 23, 2023, 6:22 PM IST

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने 2025 पासून नवीन अभ्यासक्रम लागू करण्याची घोषणा केली आहे. या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी आंदोलन करत होते. विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीला यश आले असुन आयोगाने 2025 पासून नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

MPSC
MPSC

मुंबई : राज्य सेवा मुख्य परिक्षेसंदर्भात एमपीएससी ( महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन ) ने नविन आभ्यासक्रम 2025 मध्ये लागू करणार असल्याची घोषणा केली आहे. राज्य सेवा मुख्य परिक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन केले होते. त्यावरुन एमपीएससी परिक्षेसंदर्भात निर्णय घेतला आहे. परीक्षेचे वर्णनात्मक स्वरूप, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती तसेच उमेदवारांची मागणी लक्षात घेऊन एमपीएससीने सुधारित नविन अभ्यासक्रम 2025 मध्ये लागू करण्यात असल्याची घोषणा केली आहे.

शरद पवारांची भेट : पुण्यातील बालगंधर्व चौकात एमपीएससीचे विद्यार्थी ४८ तासांपासून उपोषणाला बसले होते. यामध्ये उपोषणकर्त्यांची प्रकृतीही खालावली होती. मात्र, आमच्या मागण्या सरकारने मान्य केल्याशिवाय आम्ही उठणार नाही, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली होती. रात्री उशिरापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी या ठिकाणी भेटी दिल्या होत्या. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंदोलनाला भेट देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत फोनवरुन संवाद साधला होता.

पवारांचा मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संवाद :शरद पवार रात्री बारामतीहून घरी येत असताना आंदोलनस्थळी येण्याची घोषणा केली होती. शरद पवार आल्यानंतर त्यांनी आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. आंदोलक विद्यार्थ्यांनी ती मागणी मान्य केली होती. साडेदहा ते अकराच्या सुमारास शरद पवार आंदोलनस्थळी आले. त्यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. येत्या दोन दिवसांत स्वत: मुख्यमंत्री आणि आयोगाचे काही अधिकारी एमपीएससी आयोगासोबत येणार असल्याचे शरद पवार म्हणाले. तुमच्यापैकी कोणतेही पाच प्रतिनिधी पाठवा आणि आयोग त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहे. त्यामुळे तूर्तास हे आंदोलन मागे घ्या, असे आवाहन शरद पवार यांनी केल्यानंतर आंदोलकांनी ते मान्य केले होते.

निर्णय विद्यार्थ्यांना मान्य नव्हता :आम्ही विद्यार्थी गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सेवा परीक्षेची तयारी करत आहोत. पण अचानक आयोगाने आदेश जारी केला की 2023 पासून तुमचा अभ्यासक्रम बदलला जात आहे. हा निर्णय आम्हाला मान्य नाही. आयोगाने तो नियम २०२५ मध्ये लागू करावा, अशी आमची राज्य सरकारकडे मागणी आहे. त्यामुळे 2025 पासून आमच्या अभ्यासक्रमाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारला सहज शक्य आहे. त्यामुळे राज्य सरकारने विद्यार्थ्यांचा विचार करून निर्णय घ्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आली होती.

हेही वाचा -CM On Matoshree : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मातोश्रीबद्दल मोठे विधान म्हणाले...

Last Updated :Feb 23, 2023, 6:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details