महाराष्ट्र

maharashtra

SSC HSC Supplementary Exam Result: दहावीसह बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर, 'असा' पाहा निकाल

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 28, 2023, 1:00 PM IST

Updated : Aug 28, 2023, 2:12 PM IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) घेण्यात आलेल्या इयत्ता 10वी आणि 12वी च्या पुरवणी परीक्षेचे निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर झाला. हा निकाल विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या या mahresult.nic.in अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे.

SSC HSC Supplementary Exam Result:
दहावी बारावी पुरवणी परीक्षा निकाल

मुंबई: दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा संपलीय. दहावी व बारावी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा घेण्यात येते. या परीक्षांचे निकाल आज जाहीर होणार असल्यानं विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली होती. निकाल जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईटवरून गुणपत्रिका डाऊनलोड आणि प्रिंट काढता येणार आहे.

शिक्षण मंडळाकडून लातूर, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती आणि नाशिकसह नऊ विभागीय मंडळांमध्ये 18 जुलै 2023 ते 1 ऑगस्ट दरम्यान दहावीची पुरवणी परीक्षा घेण्यात आली. परीक्षा काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे वेळापत्रकापत्रकात बदल करून यंदा परीक्षा घेण्यात आली होती. त्यामुळे यंदा निकालाची प्रक्रिया लांबली आहे.

  • दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी वेबसाईट: www.mahresult.nic.in
  • गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी वेबसाईट: दहावीसाठी : http://verification.mh-ssc.ac.in बारावीसाठी : http://verification.mh-hsc.ac

पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अशी आहे प्रक्रिया

  • परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
  • त्यासाठी उत्तपत्रिकेची प्रत वेबसाईटवरून काढावी लागणार आहे. ही प्रत पाच दिवसात शुल्क भरून विभागीय मंडळाकडं ऑनलाईन अर्ज भरून द्यावी लागणार आहे.
  • विद्यार्थ्यांना उद्यापासून ही ऑनलाईन 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2023 पर्यंत प्रक्रिया करता येणार आहे.

यंदाही मुलींनीच बाजी मारली-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावीची लेखी परीक्षा गुरुवार 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षेसाठी एकूण 15,77,256 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. तर दहावीच्या परीक्षेत लातूर जिल्ह्यातील 94.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालात लातूर विभागाचा एकूण निकाल 92.16 टक्के इतका लागला आहे. या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून आले.

कोकण विभागाचा सर्वाधिक व नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत मुलींचा निकाल हा 95.87 टक्के लागला. विभागीय मंडळातून कोकण विभागाचा निकाल हा 98.11 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा 92.05 टक्के लागला.

हेही वाचा-

  1. SSC Result 2023: दहावीच्या निकालात लातूर पॅटर्नने मारली बाजी; लातूर विभाग राज्यात सातवा क्रमांकावर
  2. SSC Result 2023 : 59 वर्षाच्या आज्जी झाल्या दहावी उत्तीर्ण; तब्बल 40 वर्षानंतर घेतले पुस्तके हातात
Last Updated : Aug 28, 2023, 2:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details