महाराष्ट्र

maharashtra

Sharad Pawar On NCP Crisis : भाजपसोबत जो गेला 'तो' संपला; शरद पवारांचा हल्लाबोल

By

Published : Jul 5, 2023, 4:12 PM IST

Updated : Jul 5, 2023, 6:55 PM IST

राष्ट्रवादीच्या बंडखोरीवरुन शरद पवारांनी भाजपवर निशाना साधला आहे. विरोधी पक्षाची एकजूट होत असल्याने सत्ताधारी पक्षामध्ये अस्वस्थता आहे. पंतप्रधान निराधार विधाने करत आहेत. आधार नसताना विधाने करणे शहाणपणाचे लक्षण नाही, असे पवार म्हणाले.

Sharad Pawar Meeting
Sharad Pawar Meeting

मुंबई :राष्ट्रवादीच्या बंडखोरीवरुन शरद पवारांनी भाजपवर निशाना साधला आहे. राष्ट्रवादीवर बिनबुडाचे आरोप करुन पक्षाला बदनाम करण्याचे काम मोदी करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. विरोधी पक्षाची एकजूट होत असल्याने सत्ताधारी पक्षामध्ये अस्वस्थता आहे. पंतप्रधान निराधार विधाने करत आहेत. आधार नसताना विधाने करणे शहाणपणाचे लक्षण नाही, असे पवार म्हणाले. जे देशाचे नेतृत्व करतात त्यांना बोलताना काळजी घ्यावी लागते, एवढेही कळत नाही अशी टीका पवारांनी मोदींवर केली. आरोप करायचे तर नुसते आरोप करुन चालत नाही. सत्य सांगितले पाहिजे, असे ते म्हणाले. राष्ट्रवादी पक्ष भ्रष्ट आहे असे वाटत असेल तर राष्ट्रवादी पक्षाला सत्तेत का घेतले, असा सवाल पवारांनी केला. राज्यकर्ते पाहिजे ते बोलतात. एकप्रकारचे जनमानसामध्ये वेगळे वातावरण तयार करायचा प्रयत्न करतात.

भाजपसोबत जाणारे संपले : भाजपने विविध राज्याचे सरकारे उद्धवस्त केल्याचा आरोप पवारांनी केला. चर्चा केली असती तर, निर्णय घेता आला असता असे, बंडाबाबत पवार म्हणाले. एकीकडे मला पांडूरंग म्हणाचे आणी दुसरीकडे आरोप करायचा, हे कसे चालणार? असा हल्लाबोल शरद पवारांनी बंडखोरांवर केला आहे. जे भाजप सोबत जातात ते संपतात असे देखील पवार म्हणाले. भाजपचे हिंदूत्व विभाजनवादी विखारी, मनुवादी हिंदुत्व आहे. मात्र, शिवसेनेचे हिंदुत्व आठरा पगड जातींना घेऊन जाणारे आहे. राज्यात विविध शहात दंगली झाल्या. या दंगली मागे कोण होते? हे सर्व देशाला माहिती आहे, अशी टीका पवारांनी भाजपचे नाव न घेता केली. देशात महागाई, बेरोजगारी, सारखे प्रश्न आहे. भाजपला सत्तेपासुन दुर करुन राष्ट्रवादीला सत्तेत आणण्याचे काम आपल्यला करायचे आहे. जे गेले त्यांची चिंता करु नका. त्यांना तिथे सुखाने राहु द्या, असे देखील पवार म्हणाले.

राष्ट्रवादीवर बिनबुडाचे आरोप :राष्ट्रवादीच्या बंडखोरीवरुन शरद पवारांनी भाजपवर निशाना शाधला आहे. राष्ट्रवादीवर बिनबुडाचे आरोप करुन पक्षाला बदनाम करण्याचे काम मोदी करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. पक्षासमोर संकटे खुप आहे. एखादी गोष्ट मान्य नसेल तर त्यावर संवाद साधने म्हत्वाचे आहे. देशात आज लोकशाहीमध्ये संवाद होत नाही. मी राज्यात मुख्यमंत्री होतो. तेव्हा माझी काम करण्याची पध्दत वेगळी होती. मी एखादा निर्णय घेतला की, जनतेच्या काय भावना आहेत त्या जाणुन घेत होते, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. आजची बैठक एतिहासीक बैठक आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या बैठकीकडे आहे. पक्ष स्थापन होऊन चोवीस वर्ष झाली. त्यात विविध कार्यकर्त्यांची फळी तयार करता आली. अनेकांना विविध पदावर संधी मिळाली, अनेक नेते तयार केले. मध्यंतरी मनामध्ये एकच भावना होती. राज्यात बदल कसा करता येईल, याचा विचार सरु होता असे देखील पवार म्हणाले.

मोदींना मर्यादा पाळण्याची गरज : आज देशाच्या जनतेत अस्थवस्था आहे. विरोधक एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. पटाण्यात आम्ही विरोधकांची बैठक घेतली. तिथे देशाच्या प्रश्नाची चर्चा केली. त्यावर देशाच्या पंतप्रधांनानी भोपळमध्ये एक भाषण केले. त्यात त्यांनी विरोधकांवर घोटाळ्याचा आरोप केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील 70 लाख कोटींचा घोटळा केला असे मोदी म्हणाले. कुठलाही आधार नसतांना असे, विधाने करणे चांगले लक्षण नसल्याची टीका शरद पवारांनी नरेंद्र मोंदीवर केली आहे. देशाचे पंतप्रधान म्हणुन त्यांनी काही मर्यादा पाळयाला हव्या, असा टोला देखील त्यांनी मोदींना लगावला आहे.

घोटाळेबाज सरकारमध्ये कसे ?: राष्ट्र्रवादी काँग्रेस पक्ष घोटाळेबाज असेल तर, काल मंत्रीमंडळात राष्ट्रवादीच्या नेत्यांना कशी शपथ दिली, असा सवाल शरद पवार यांनी मोदींना विचारला आहे. राष्ट्रवादीबाबत अनेकांनी वेगळी भूमिका घेतली. त्याला माझी काही हरकत नसल्याचे शरद पवार म्हणाले. राष्ट्रावादीत खलबते सुरु असल्याची चर्चा सुरु होती. त्यासंदर्भात छगन भूजबळांनी मला फोन केला होता. तिथे नेमके काय चालले याची माहिती घेऊन येतो, असे त्यांनी फोनवर सांगितले. मात्र, भूजबळ परत न येता त्यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्याचे कळाले. अजित पवारांच्या पाठीमागचे बॅनर पाहिले, त्यावर माझा सर्वात मोठा फोटो होता. माझे फोटो वापरल्याशिवाय त्यांचे नाने चालनार नाही हे त्यांनी माहित होते. त्यांना चालणारे नाने हवे होते म्हणुन त्यांनी माझा फोटोचा वापर केला असे शरद पवार म्हणाले.

हेही वाचा -Ajit Pawar Meeting : अध्यक्षपदावर राहायचे होते तर राजीनामा का दिला? अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा

Last Updated :Jul 5, 2023, 6:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details