महाराष्ट्र

maharashtra

Sharad Pawar NCP Meeting : चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही; शरद पवारांचा कार्यकर्त्यांना विश्वास

By

Published : Jul 5, 2023, 7:16 PM IST

Updated : Jul 5, 2023, 7:46 PM IST

यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मेळावा झाला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासह गेलेल्या आमदारांना फटकारले. जे गेले त्यांना जाऊ द्या, त्यांची चिंता करू नका. आपण सामूहिक शक्तीतून कर्तृत्ववान नेतृत्व घडवू, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

Sharad Pawar
शरद पवार

सभेत बोलताना शरद पवार

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर दावा केला. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासह गेलेल्या आमदारांना फटकारले. जे गेले त्यांना जाऊ द्या, त्यांची चिंता करू नका. त्यांना सुखात राहू द्या महाराष्ट्रात आपण सामूहिक शक्तीतून कर्तृत्ववान नेतृत्व घडवू, असा दृढ विश्वास व्यक्त केला. आजवर अनेक चिन्हावर निवडणुका लढवल्या आहेत. त्यामुळे चिन्हांची काळजी नाही. ते कुठेही जाणार नाही असे सांगत पदाधिकाऱ्यांचे मनोबल वाढवले.



राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबई जन्म: यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मेळावा झाला. शरद पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजप, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांचा खरपूस समाचार घेतला. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पवार म्हणाले की, 24 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबई जन्म झाला. षण्मुखानंद येथे पहिली बैठक झाली आणि संध्याकाळी शिवाजी पार्कवर लाखोंच्या संख्येत सभा झाली.

काही केले तर पक्ष आणि चिन्ह जाणार नाही, ते जाऊ दिले जाणार नाही. महाराष्ट्रात आपण सामूहिक शक्तीतून कर्तृत्ववान नेतृत्व घडवू,आजवर अनेक चिन्हावर निवडणुका लढवल्या आहेत. त्यामुळे चिन्हांची काळजी नाही. - शरद पवार

राष्ट्रवादीला आले यश : राष्ट्रवादीला आज 24 वर्षे पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेतृत्वाची फळी उभा करण्यासाठी राष्ट्रवादीला यश आले आहे. अनेकांना आमदार, खासदार, कोणाला मंत्रिमंडळात, कोणाला विधिमंडळात पाठवले. महाराष्ट्राचा चेहरा, नेते बदलणे ही एकच भावना मनात होती. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता सुद्धा राज्य चालू शकतो, हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण देशाला दाखवून दिल्याचे पवार म्हणाले.

जे माझा फोटो लावतात, त्यांना माहिती आहे की त्यांच नाण चालणार नाही. त्यामुळे मला एकीकडे गुरु मानायचे आणि पांडुरंग म्हणायच, आमच्याकडे दुर्लक्ष करायचे ही गमतीची गोष्ट झाली - शरद पवार



'या' चिन्हावर निवडणुका लढवल्या :पक्ष आणि चिन्हावर दावा करणाऱ्या अजित पवार यांना देखील शरद पवार यांनी खडसावले. राजकीय जीवनात अनेक निवडणुका लढल्या. सातत्याने चिन्ह बदलली. बैल, गाय - वासरू, चरखा, हात आणि त्यानंतर घड्याळ या चिन्हावर निवडणुका लढवल्या आहेत. त्यामुळे चिन्हांची काळजी नाही. ते कुठेही जाणार नाही. जोपर्यंत सामान्य माणसाच्या अंतकरणात पक्षाचा विचार आणि कार्यकर्त्यांची भूमिका आहे. तोपर्यंत चिंता करण्याच काहीही कारण नाही, असे सांगत शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांचे मनोबल वाढवले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.



अजित पवार गटाला काढला चिमटा: काही जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारे विरोधात गेले आहेत. राजकीय विचार त्यांना मान्य नाहीत. जे पक्षाच्या विचारधारेशी मतदारांशी प्रतारणा करतात, त्यांच्या सोबत जाणे योग्य नाही. आज त्यांच्या बॅनर माझा फोटो आहे, त्यांना माहित आहे. आपल नाण खणखणीत नाही. त्यामुळे मला एकीकडे गुरु मानायचे आणि पांडुरंग म्हणायच, आमच्याकडे दुर्लक्ष करायचे ही गमतीची गोष्ट झाली आहे, असा चिमटा अजित पवार गटाला काढला. छगन भुजबळ तुरुंगातून आल्यानंतर पक्षांतर्गत विरोध असतानाही त्यांच्यावरती अन्याय होऊ दिला नाही. मात्र रविवारी फोन आला काय चाललय ते बघून येतो, असे सांगून गेले. तसेच मंत्री पदाची शपथ घेतली असे सांगत छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला.

हेही वाचा -

  1. Sharad Pawar On NCP Crisis : भाजपसोबत जो गेला 'तो' संपला; शरद पवारांचा हल्लाबोल
  2. Maharashtra Political Crisis Updates : राष्ट्रवादी पक्ष आणि पक्ष चिन्हावर दावा करणारी अजित पवारांची याचिका निवडणूक आयोगाला प्राप्त
  3. NCP Delhi Meeting : शरद पवारांची ताकद दिल्लीत दिसणार का? गुरुवारी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक
Last Updated : Jul 5, 2023, 7:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details