महाराष्ट्र

maharashtra

Congress Leaders Meeting: महाराष्ट्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक सुरू, पक्षांतर्गत गटबाजीसह विरोधी पक्षनेता निवडीवर चर्चा होणार?

By

Published : Jul 11, 2023, 10:46 AM IST

Updated : Jul 11, 2023, 12:10 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी अजित पवार आपल्या सहकाऱ्यांसोबत सत्तेत सहभागी झाली. त्यानंतर आता राज्यामध्ये काँग्रेसमधील राज्यातील काही नेते भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक आज बोलवली आहे.

Congress Leaders Meeting
काँग्रेस नेत्यांची बैठक

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर काँग्रेस पक्षात कोणत्याही प्रकारची फूट पडणार नसल्याचे वारंवार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काँग्रेस पक्षात दोन गट पडले. नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यासाठी अनेक महिन्यापासून एक गट सक्रिय होता. गेल्या दोन महिन्यापासून मात्र काँग्रेसमधील वातावरण शांत दिसल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर काँग्रेस पक्षाकडून वेगवान घडामोडी घडताना दिसत आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्यातील काँग्रेसच्या बड्या नेत्यांची बैठक 14 जुलै रोजी होणार होती, मात्र ती बैठक आज होणार आहे. दिल्लीतील पक्ष कार्यालयात 11 वाजता बैठकीला सुरवात होणार आहे.


विरोधी पक्ष नेते पदावर शिक्कामोर्तब :महाराष्ट्र विधिमंडळ विरोधी पक्ष नेते पदावर काँग्रेस पक्षाचा दावा असण्याची शक्यता आहे. कारण की विधानसभेतील आमदारांची संख्या काँग्रेसकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा जास्त आहे. त्यामुळे विरोधीपक्ष पक्षनेता काँग्रेसचाच हवा, असा सूर काँग्रेसमधील मोठ्या नेत्यांनी लावल्याचे दिसते. विरोधीपक्ष नेतापदाच्या नावावर आज दिल्लीतील बैठकीत शिक्कामोर्तब होईल. विजय वडेट्टीवार यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्ष नेता पदावर बसवल्यास काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी रोखण्यास मदत होणार आहे.


नेते बैठकीसाठी दिल्लीला रवाना : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी त्यासोबत केंद्रीय काँग्रेसचे नेते यांच्या उपस्थितीमध्ये राज्यातील महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित असणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, सतीश पाटील, सुनील केदार यासोबत इतरही काही नेते आजच्या बैठकीला असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार एकंदरीत 25 नेते बैठकीसाठी दिल्लीला रवाना झाले आहे.

पक्षातील अंतर्गत गटबाजी : महाविकास आघाडीतील जागा वाटपा संदर्भात देखील आजच्या बैठकीत चर्चा होण्याचे समजते. राज्यातील संघटनात्मक बदलाचे देखील संकेत मिळत आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या नवीन नावाबाबत देखील चर्चा होणार असल्याचे समजते. येणाऱ्या महापालिका लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी पक्षाला डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये काँग्रेस पक्षश्रेष्ठींना रोखण्यात यश येते का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.


हेही वाचा :

  1. Ashok Chavan: काँग्रेस फुटीच्या खोट्या-नाट्या बातम्या करण्याचा विरोधकांचा डाव - अशोक चव्हाण
  2. Political crisis in NCP : शिंदे, पवारांच्या स्क्रिप्ट भाजप मुख्यालयातूनच, नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल
  3. Congress Agitation Pune: राहुल गांधींसाठी काँग्रेसपक्ष मैदानात, पुण्यात आंदोलन
Last Updated : Jul 11, 2023, 12:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details