महाराष्ट्र

maharashtra

Maharashtra Bhavan In Ayodhya अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारणार, योगी आदित्यनाथांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली माहिती

By

Published : Jan 5, 2023, 1:04 PM IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Chief Minister Yogi Adityanath ) यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde Meet With Yogi Adityanath ) यांची भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये महत्वाच्या विषयावर चर्चा झाली. त्यासह अयोध्येत महाराष्ट्र भवन ( Maharashtra Bhavan Will Build In Ayodhya ) उभारण्याबाबतही या दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्याबाबत योगी आदित्यनाथ हे सकारात्मक असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

Eknath Shinde Meet With Yogi Adityanath
योगी आदित्यनाथ यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेते

मुंबई - उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Chief Minister Yogi Adityanath ) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde Meet With Yogi Adityanath ) यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच चर्चा झाली. भेटीनंतर अयोध्येत महाराष्ट्र भवन ( Maharashtra Bhavan Will Build In Ayodhya ) उभारण्याबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सकारात्मक आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, माजी केंद्रीय मंत्री राम नाईक तसेच खासदार रवी किशन हे देखील यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावरउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Chief Minister Yogi Adityanath Visit To Mumbai ) हे सध्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडे अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा देण्याची मागणी केली. योगी आदित्यनाथ यांनी या मागणीला तत्वतः मंजुरी दिल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच लवकरच प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्या दौऱ्यावर येणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी योगी आदित्यनाथ यांना सांगितले. यावर उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने लवकरच आमंत्रित केले जाईल. तुम्ही अयोध्येला आवर्जून भेट द्या, असे योगींनी निमंत्रित केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आगामी फिल्म सिटीबाबत चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांची घेणार भेटमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Yogi Adityanath Meet to Governor Bhagat Singh Koshyari ) यांची भेट घेतली. मुंबईतील गुंतवणुकदारांना भेटण्यासाठी आले आहेत. नोएडा येथे आगामी फिल्म सिटीच्या संदर्भात देशातील आघाडीचे टायकून आणि बँकर्स तसेच प्रमुख चित्रपट व्यक्तिमत्त्वांची योगी आदित्यनाथ हे भेट घेणार आहेत. संभाव्य गुंतवणूकदारांना उपलब्ध संधी आणि उत्तर प्रदेशातील अनुकूल व्यावसायिक वातावरणाची ओळख करून देण्यासाठी देशातील नऊ शहरांमध्ये रोड शो आयोजित करण्यात येणार आहे. तसेच हा रोड शो आणि शीर्ष उद्योगपती आणि बँकर्स यांच्या भेटीपूर्वी घेतील. उत्तर प्रदेशला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी आणि परदेशी गुंतवणूकदारांना ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट (जीआयएस २०२३) मध्ये आमंत्रित करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जबाबदारी स्वीकारली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details