महाराष्ट्र

maharashtra

Mumbai Pune Expressway Toll: मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील टोल वाढणार; जाणून घ्या कारण

By

Published : Mar 29, 2023, 9:01 AM IST

Updated : Mar 29, 2023, 9:38 AM IST

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील टोल वाढणार आहे. ही दरवाढ 1 एप्रिलपासून होणार आहे. त्यामुळे मुंबई पुणेकरांचा खिसा खाली होणार आहे.

Mumbai Pune Expressway Toll
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील टोल वाढणार

मुंबई :टोल वाढला की सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागते. आता मुंबई ते पुणे या दरम्यानच्या प्रवास देखील महागणार आहे. याचा फटका मुंबईकर आणि पुणेकर यांना बसणार आहे. मुंबई ते पुणे हा प्रवास चार ते साडे चार तासांचा होता. प्रवासाचा कालावधी कमी करण्यासाठी राज्य सरकारच्या रस्ते विकास विभागाकडून मुंबई पुणे एक्सप्रेस वे बांधण्यात आला. हा रस्ता बांधल्याने अडीच तासात मुंबई ते पुणे प्रवास शक्य झाला आहे. या रस्त्याचा वापर लाखो प्रवासी रोज करत आहे. या रस्त्याचा खर्च आणि डागडुजी यासाठी लागणारा खर्च टोल वसूल करून जमा केला जातो. सध्या वाढलेली महागाई लक्षात घेता या एक्सप्रेस वे वरील टोलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय रस्ते विभागाकडून घेण्यात आला आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील टोल


प्रवाशांना फटका : सध्या या एक्सप्रेस वे वर जो टोल वसूल केला जात होता. तो टोल कमी प्रमाणात होता. या मार्गाची करावी लागणारी डागडुजी, त्यासाठी लागणारा खर्च यामध्ये गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या वाढीमुळे टोल वसुलीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या रस्ते विभागाने घेतला आहे. ही दरवाढ झाल्याने मुंबई आणि पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसणार आहे.


किती रुपये टोल द्यावा लागेल : नव्या दरानुसार, नव्या दरांनुसार चारचाकीचा टोल 270 रुपयांवरून 316 रुपये होणार आहे. तर, बससाठी टोलचा 795 रुपयांवरुन 940 रुपयांवर जाणार आहे. ट्रकसाठी 580 रुपयांवरून 685 रुपये द्यावे लागणार आहे. तर टेम्पोसाठी 420 रुपयांऐवजी 495 रुपये टोल आकारला जाणार आहे. थ्री एक्सेलसाठी 1380 रुपयांवरून 1630 रुपये टोल होणार आहे. तर एम एक्सेलसाठी 1835 ऐवजी 2165 रुपये मोजावे लागतील.

हेही वाचा : Khed Shivapur Toll Plaza: खेड शिवापुर टोलनाक्यावरील होणारी टोल वसुली थांबवा; टोल नाका हटाव समितीने दिला उग्र आंदोलनाचा इशारा

Last Updated :Mar 29, 2023, 9:38 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details