महाराष्ट्र

maharashtra

Encounter Specialist Daya Nayak: पोलीस अधिकारी दया नायक यांच्याकडून 80 गुंडांचे एन्काउंटर; पहिला कोणाचा केला होता एन्काउंटर?

By

Published : Apr 20, 2023, 9:55 AM IST

Updated : May 8, 2023, 2:23 PM IST

'चकमक फेम' अशी ख्याती असलेल्या पोलीस अधिकारी दया नायक यांची महाराष्ट्र दहशतवाद विरोध पथकातून मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. संपूर्ण जगात ठसा उमठवणारे मुंबई पोलीस दल आहे. मुंबई पोलीस दल हे दया नायक या जिगरबाज आणि दबंग पोलिसामुळे नावाजले. दया नायक यांनी जवळपास 80 गुंडांचा एन्काउंटर केला आहे.

Encounter Specialist Daya Nayak
एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक

मुंबई पोलीस दलात दया नायक यांची बदली झाल्यामुळे गुन्हेगारांच्या छातीत धडकी भरली असेल - ज्येष्ठ पत्रकार घनश्याम भडेकर

मुंबई :पोलीस अधिकारी दया नायक यांच्या एन्काउंटरमुळे त्यांना वृत्तपत्रातून जबरदस्त प्रसिद्धी मिळाली. आता पुन्हा मुंबई पोलीस दलात दया नायक यांची बदली झाली आहे, त्यामुळे गुन्हेगारांच्या छातीत धडकी भरली असण्याची शक्यता ज्येष्ठ पत्रकार घनश्याम भडेकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना वर्तवली आहे. कारण दया नायक हे केवळ नाव ऐकल्यावर ९० च्या दशकात मुंबईतल्या दादा-भाई अशा गुन्हेगारी जगतातल्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकायची. दया नायक यांची ओळख फक्त मुंबईच नाही, तर संबंध देशात एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून होती, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार घनश्याम भडेकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.


एन्काउंटर स्पेशालिस्ट होण्याचा प्रवास : एमपीएससी परीक्षा देऊन त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर दया नायक यांनी पोलीस दलाची निवड केली. त्यांनतर दया नायक यांची पहिली पोस्टिंग पश्चिम उपनगरातील जुहू पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून करण्यात आली होती. दरम्यान, दया नायक यांनी मुंबई क्राईम ब्रँचमध्ये पोलीस अधिकारी तथा एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले होते. 1996 मध्ये दया नायक यांनी प्रदीप शर्मा यांच्यासह अंडरवर्ल्ड डॉन बबलू श्रीवास्तवच्या दोन गुंडांना गोळ्या घालून ठार केले. दया यांचा एन्काउंटर स्पेशालिस्ट होण्याचा प्रवास इथून सुरू झाला. दया नायक यांनी डॉन बबलू श्रीवास्तवच्या दोन गुंडाचा खात्मा केला, हाच त्यांनी केलेला पहिला एन्काउंटर होता. दया नायक यांनी एलटीटीईच्या ३ सदस्यांना चकमकीत ठार मारले होते. त्यावेळी तिघेही मुंबईतील गुंड अमर नाईकसाठी काम करत होते.


दया नायक यांच्यावर चित्रपट :त्यानंतर दया नायकने अनेक अंडरवर्ल्ड टोळीच्या साथीदारांना संपवले. सादिक कालिया, श्रीकांत मामा, रफिक डिब्स वाला, परवेझ सिद्दीकी, विनोद भाटकर आणि सुभाष यांच्यासह डझनभर गुंडांना एन्काउंटरमध्ये ठार केले. दया नायक यांनी 80 हून अधिक गुन्हेगारांचा एन्काउंटर केला आहे. दया नायक यांच्या जीवनावर बॉलीवूडमध्येही अनेक चित्रपट बनले आहेत, ज्यात 'अब तक छप्पन' आणि 'दया नायक लायसन्स टू किल' हे प्रमुख चित्रपट आहेत.

हेही वाचा : Encounter Specialist Daya Nayak : एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची पुन्हा मुंबई पोलीस दलात बदली

Last Updated : May 8, 2023, 2:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details