महाराष्ट्र

maharashtra

बलात्कार प्रकरणात निरपराधांना पकडले पोलिसांच्या चौकशीचे आदेश

By

Published : May 29, 2022, 6:37 PM IST

बलात्कार प्रकरणात (Rape case) आरोपी समजुन निरपराध्यांना पकडण्यात आले (Innocent caught in rape case) त्यांना कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान कथीत आरोपी गुन्हा घडला त्यावेळी दुसऱ्याच ठिकाणी उपस्थित असल्याचे पुरावे समोर आल्यामुळे त्यांना जामिन मंजुर झाला आहे. मात्र या प्रकरणी त्यांना अटक करणाऱ्या पोलीसांच्या चौकशीचे आदेश (Police inquiry order) देण्यात आले आहेत.

Police inquiry order
पोलिसांच्या चौकशीचे आदेश

मुंबई:धारावी मध्ये 20 वर्षीय विवाहितेवर चाकूचा धाक दाखवत सामूहिक बलात्कार झाल्याची घटना (Rape case) 11 मे रोजी घडली होती. या प्रकरणात धारावी पोलिसांनी दोन भावंडांना अटक (Innocent caught in rape case) केली होती, मात्र आरोपींच्या कुटुंबीयांकडून देण्यात आलेल्या एका व्हिडिओ मूळे पोलिसांची चांगलीच नाचक्की झाली आहे त्यामुळे संबंधित दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीची चौकशी करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त संजय पांडे (CP Sanjay Pandey) यांनी दिले असून निरपराध आरोपींना बांद्रा महानगर दंडाधिकारी न्यायालयातून जामीन मंजूर झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बलात्काराच्या आरोपांमध्ये अटक करण्यात आलेले दोन्ही भावंडां विरोधात पोलिसांकडून ढिसाळ तपास आणि कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय दोन अल्पवयीन भावांना चुकीच्या पद्धतीने अटक केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून त्यांचे विभागीय चौकशी करण्याचे निर्देश देखील पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.



आरोपींच्या कुटुंबीयांनी ते दोघेही विलेपार्ले इथे असल्याचा व्हिडिओ सादर केला. मात्र बलात्कार झाले ते ठिकाण धारावीमध्ये सुमारे 8 किमी दूर आहे. दोन्ही ठिकाणी एकाच वेळी उपस्थित राहणे शक्य नाही. त्यामुळे निष्कर्षापर्यंत येण्यापूर्वी या मुलांना सोडण्यापूर्वी पोलिसांकडून या सर्व बाबींची पडताळणी करण्यात आली त्यानंतर असे निष्पन्न झाले की पोलिसांकडून कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय दोन आरोपींना अटक करण्यात आले आहे.

धारावी पोलिसांनी सीआरपीसी 169 अन्वये दोषमुक्त करण्यासाठी अर्ज दाखल केल्यानंतर शुक्रवारी अनिल चौहान (19) आणि नीलेश चौहान (20) या दोन भावांना वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयानं प्रत्येकी 15,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्याखाली जामिनावर सोडून दिले. 11 मे रोजी एका 20 वर्षीय गृहिणीने आरोप केला होता की, तिचे सासरे मॉर्निंग वॉकसाठी निघाल्यानंतर ती घरी एकटी असताना दोन अज्ञात पुरुष तिच्या घरात घुसले तिचे हात बांधले आणि चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्यांनी या कृत्याचे चित्रीकरणही केले अशी तक्रार तीने केली.



तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवला आणि सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली. 16 मे रोजी धारावी पोलिसांनी सांगितले की आम्ही या प्रकरणाचा छडा लावला आणि चौहान बंधूंना अटक केली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत बलात्काराच्या आरोपाखाली अटक केलेले हे दोन तरुण गुन्ह्याच्या वेळी इतरत्र हजर असल्याचे आढळून आले.



आरोपींनी बलात्काराचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी धारावी पोलिस बलात्काराचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहेत. या प्रकरणी धारावी पोलिस ठाण्यात दोन आरोपीविरोधात भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 376,376 (डी),425, 354,(ए) 354(बी), 354(डी), 506(2), भादवि सह कलम 67,67 (अ),66(इ ) माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.




धारावी परिसरात तक्रारदार 20 वर्षीय विवाहित तरुणी सासरच्या मंडळींसोबत राहण्यास आहे. मंगळवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तरुणी घरात झोपली असताना, तिचे सासरे दरवाजा न लावता घराबाहेर पडले. दोन अज्ञात व्यक्ती घरात घुसल्या. आरोपींनी चाकूचा धाक दाखवून विवाहितेवर बलात्कार केला. यावेळी एका आरोपीकडून या घटनेचे मोबाइलवर चित्रीकरण सुरू होते. आरोपींनी आपली ओळख लपवण्यासाठी चेहऱ्यावर रुमाल बांधला असल्याचे विवाहितेने पोलिसांना सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details