महाराष्ट्र

maharashtra

Sharad Pawar Politics : शरद पवारांच्या राजकारणातील महत्त्वाचे टप्पे, वाचा सविस्तर

By

Published : May 2, 2023, 3:48 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेक चर्चा सुरू झाले आहेत. मात्र, शरद पवार यांच्या राजकारणातील काही महत्त्वाचे टप्पे आहेत त्याबाबत जाणून घेऊया.

Sharad Pawar
Sharad Pawar

मुंबई :शरद पवार हे राज्याच्या राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आपले राजकारण सुरू केलं. बारामती चे आमदार ही ओळख घेऊन राजकारणात आलेल्या शरद पवार यांनी पहिल्यांदा आपल्या राजकीय चाली आणि डावपेच यांचा वापर 1978 मध्ये केला. 1978 मध्ये जनता पक्षाच्या साथीने आलेल्या सरकार मधून 40 आमदारांसह बाहेर पडत पुलोदची स्थापना करून नवीन सरकार स्थापन करत पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. काँग्रेस पक्षातून पहिल्यांदा ते बाहेर पडले.

पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल :1980 नंतर देशातील राजकीय परिस्थिती बदलली असताना इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुन्हा एकदा शरद पवार काँग्रेसमध्ये सामील झाले. 1986 मध्ये ते पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर 1988 मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते.

सोनिया गांधी यांच्याशी वैचारिक मतभेद :देशाच्या राजकारणामध्ये संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारून पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारलेल्या शरद पवार यांना पंतप्रधान पदाची खुर्ची मिळू शकली नाही त्यातच सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्रे गेल्यानंतर सोनिया गांधी यांच्या परदेशी मुळाचा उल्लेख करीत त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेस मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

आघाड्यांच्या राजकारणात पवार महत्त्वाचे :1995 नंतर राज्यासह देशात आघाड्यांच्या राजकारणाला सुरुवात झाली आणि या आघाड्यांच्या राजकारणामध्ये राजकीय सत्तेची समीकरणे जुळवण्यासाठी शरद पवार यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाऊ लागले. काँग्रेस बहुमतात नसल्याने पाठिंब्यावर सरकार स्थापन करावं लागत होतं आणि त्यात शरद पवार यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची ठरत होती. 1999 पासून शरद पवार यांनी स्वतःच्या पक्षाची स्थापना केली.

2004 मध्ये यूपीएत सहभागी :सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकारची स्थापना झाल्यानंतर या सरकारमध्ये शरद पवार सहभागी झाले आणि त्यांनी कृषिमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आणि पुन्हा एकदा काँग्रेसची जवळीक साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या देशात काँग्रेस शिवाय पर्याय नाही हे शरद पवारांनी सातत्याने म्हटले आहे.

2019 मध्ये पुन्हा जवळीक :2019 मध्ये महाराष्ट्रात उद्भवलेल्या राजकीय सत्ता संघर्षाच्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा काँग्रेस शिवाय पर्याय नाही हे लक्षात आल्यानंतर शरद पवार यांनी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची आघाडी करून राज्यात भाजपला शह देत सत्ता स्थापन केली.

हेही वाचा - Sharad Pawar Retirement : शरद पवारांचा अध्यक्षपदावरुन निवृत्तीचा निर्णय; जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड ढसाढसा रडले

ABOUT THE AUTHOR

...view details