महाराष्ट्र

maharashtra

Home Minister Orders Inquiry : पोलीसांच्या बदल्यांची यादी फुटली कशी? गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

By

Published : Jan 12, 2022, 2:21 PM IST

police transfers break up

राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी (List of transfers of police officers ) गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी तयार केली होती. गृहमंत्र्यांच्या कार्यालयातील २१ कर्मचारी अधिकाऱ्यांना करोनाची लागण झाली त्यामुळे या यादीस विलंब झाला. नंतर ही यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याकडे सहीसाठी पाठवण्यात आली होती. परंतु तत्पुर्वीच यादीतील नावे व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. आता या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत.

मुंबई:मंगळवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी समाजमाध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाली. ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या व त्यांना त्या जागी रस नव्हत्या अशांनी देखील या यादीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. गृहमंत्र्यांनी अधिकाऱ्यांमार्फत यादी तयार करून मुख्यमंत्र्यांच्या अंतिम परवानगीसाठी पाठवली होती. पण या यादीतली नावे बाहेर आल्याने मुख्यमंत्र्यांची सही होण्याअगोदरच राज्यभर या बदलांची चर्चा सुरू झाली. या यादीतील नावे बाहेर कशी आली याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आता या सर्व बदल्या मार्च महिन्यातच होणार आहेत असे गृह मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून अहवाल द्यावा, असा आदेश सायबर सेल ला सुद्धा देण्यात आलेला आहे
यापूर्वीसुद्धा तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील असताना अशाच पद्धतीची बदल्यांची यादी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची सही होण्याआधीच बाहेर आली होती. तेव्हा ज्या अधिकाऱ्यांनी यादी जाणीपूर्वक बाहेर लिक केली होती त्या अधिकाऱ्यांना गृहमंत्री आर आर पाटील यांनी कारवाई केली होती. आता या प्रकरणात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील काय करणार याकडे सर्व पोलीस दलाचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details