महाराष्ट्र

maharashtra

Rajya Sabha Elections : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राज्यात हाय व्होल्टेज ड्रामा

By

Published : Jun 7, 2022, 10:01 PM IST

Updated : Jun 7, 2022, 10:18 PM IST

Meeting of Mahavikas Aghadi
महाविकास आघाडीची बैठक ()

राज्यसभेच्या सहाव्या जागेची चुरस (the sixth seat of Rajya Sabha ) चांगलीच वाढली आहे. जागा जिंकण्यासाठी अघाडीने कंबर कसली आहे. दगा फटका नको म्हणुन शिवसेनेने सर्व आमदार ट्राइड हॉटेलमध्ये ठेवले आहेत. महाविकास अघाड़ी (MVA) च्या रणनिती साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रावादीचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे आदिनेते याच हाॅटेलमधे बैठक घेत आहेत त्यामुळे राज्यात पुन्हा हाय व्होल्टेज ड्रामा (High voltage drama in state) पहायला मिळत आहे.

मुंबई:राज्यसभेच्या ( Rajya Sabha election ) महाराष्ट्रातील ( Maharashtra ) सहा जागांसाठी 10 जूनला फैसला होणार आहे. जागा सहा आणि उमेदवार सात झाल्याने निवडणुकीची चुरस चांगलीच वाढली आहे. महाविकास आघाडी विशेषत: शिवसेना ( Shivsena ) आणि भाजपमध्ये ( BJP ) कोण बाजी मारणार हे या निवडणुकीतून सिद्ध येईल. दरम्यान, राजकीय हालचाली वेगाने होत असून शिवसेनेने आपल्या आमदारांना हॉटेल द रिट्रीटमधून ट्रायडंट हॉटेलमध्ये हलविले आहे.

महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांच्या संख्येनुसार राज्यसभेवर सहा जण महाराष्ट्रातून निवडून जाणार आहेत. यात भाजपचे दोन, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी एक उमेदवार निश्चितपणे निवडून येईल, असे संख्याबळ त्या त्या पक्षांकडे आहे. सहाव्या जागेसाठी मात्र भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे. निवडणुकीचा दिवस जवळ आल्याने महाविकास आघाडी आणि भाजपनेही युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, राजकीय हालचाली वेगाने होत असून शिवसेनेने आज आपल्या आमदारांना हॉटेल द रिट्रीटमधून ट्रायडंट हॉटेलमध्ये हलविले आहे.

निवडणुकीत सुरवातीपासुनच रंगत निर्माण झाली आहे. सुरवातीला सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी व अपक्षांच्या मतांच्या जोरावर शिवसेनेने दावा केला आहे तर भाजपनेही आपल्याकडे असलेल्या अधिकच्या मतांच्या जोरावर आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार म्हणून कोल्हापूर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना तर भाजपने धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरवले आहे.प्रथम संभाजीराजेंनी अपक्ष निवडणूक लढविण्याचे जाहीर केले. मात्र शिवसेना प्रवेशाला त्यांनी नकार दिल्यामुळे शिवसेनेने त्यांना उमेदवारी नाकारली आणि त्यांनी निवडणुकीतुन माघार घेतली.

288 आमदारांच्यासंख्याबळानुसार सहा जण राज्यसभेवर जाऊ शकतात. निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला पहिल्या फेरीतील पहिल्या पसंतीची 42 मते आवश्यक आहेत. विधानसभेत भाजपचे 106 आमदार आहेत. याशिवाय काही अपक्षांचा त्यांना पाठिंबा आहे. त्या जोरावर भाजपचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. तिसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी त्यांना आणखी सुमारे 13 मतांची गरज आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला दुसरी जागा निवडून आणण्यासाठी काही मते कमी पडणार आहेत. काँग्रेसचे अतिरिक्त एक मत, राष्ट्रवादी काँग्रेसची 12 मते आणि शिवसेनेची अतिरिक्त 13 मते अशी 26 मते त्यांच्याकडे हमखास आहेत. सरकारला पाठिंबा दिलेल्या काही अपक्षांनी, छोट्या पक्षांनी पाठिंबा दिल्याचा दावा शिवसेना करत आहे. तथापि, शिवसेनेलाही आणखी 10-12 मतांची गरज आहे. त्यामुळे चुरस निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत वर्षा बंगल्यावर सोमवारी झालेल्या बैठकीनंतर शिवसेना आमदारांना सोमवारी रात्रीच 'द रिट्रीट' हॉटेलमध्ये नेण्यात आले. त्यांना मंगळवारी दुपारी ट्रायडंट हॉटेलमध्ये नेण्यात आले. शिवसेनेच्या गोटात पूर्ण समाधान आहे निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेने आमदारांना हॉटेलमध्ये एका ठिकाणी ठेवले आहे. भाजप आणि काँग्रेसनेही आपापले आमदार हॉटेलमध्ये हलविल्याचेही सांगितले जात आहे.राज्यसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने पियुष गोयल, डॉ. अनिल भोंडे, धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेने संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी मिळाली आहे. तर काँग्रेसने उत्तरप्रदेशातील नेते इम्रान प्रतापगढी यांना उमेदवार केले आहे.

महाविकास आघाडीची रणनीती ठरवण्यासाठी रात्री हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक घेण्यात आली यात काही अपक्ष आमदारांचाही समावेश आहे, त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहे. त्यामुळेच अनेक अपक्षांचा पाठिंबा महाविकास आघाडीला मिळात आहे. त्यासाठीच महाविकास आघाडीचे आमदार, मंत्र्यांची विशेष बैठक झाली. त्याकरता अघाडी सरकार मधिल सगळे आमदार काही अपक्ष आमदारांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काॅंग्रेसचे प्रभारी मल्लीकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह सर्व प्रमुख नेते आमदार मंत्री उपस्थित होते

सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांनी या निवडणुकीच्या तोंडावर नाराजीचा सुर आळवला, भाजपने अशा नाराजांवर लक्ष्य केंद्रित केले आहे. तर त्यांची नाराजी दुर करत शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवारालाच मते द्यावीत असे आवाहन आघाडीसह मुख्यमंत्र्यांनी केले आहे. समाजवादी पार्टीचे 2 आमदार आहेत. त्यांनीही नाराजी व्यक्त करत सर्वांचे लक्ष्य वेधुन घेतले आहे.अल्पसंख्यांक समाजासाठी कोणतेही पाऊले उचलली नसल्याचा आरोप करत त्यांनी महाविकास आघाडी नव हिदूत्वाचे प्रतिनिधीत्व करत असल्याचा आरोप केला आहे. ते या मुद्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

29 आमदार नर्णायकराहणार आहेत 288 आमदारांच्या विधानसभेतील एका सदस्याचे निधन झाल्यामुळे आता 287 मतदार आहेत. शिवसेना राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅग्रेसचे संख्याबळ 152 आहे. तर भाजपकडे 106 आमदारांचे संख्याबळ आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमधे थेट मुकाबला आहे. यातील कोणाला निवडुन द्यायचे यासाठी 29 आमदारांची भुमिका निर्णायक राहणार आहे. यात विनोद निकोल, देवेंद्र भुयार, मंजुळा गावित, नरेंद्र बोण्डेकर, किशोर जोगरेवार, आशिष जैस्वाल, विनोद अग्रवाल, संजय शिंदे, राजकुमार पटेल यांच्यासह 13 अपक्ष आमदार तर विविध लहान पक्षांचे 16 आमदार आहेत.

महाविकास आघाडी आणिभाजप दोन्ही पक्षांनी निवडणुक प्रतिष्ठेची केली आहे. अपक्षांना वळवण्यासाठी सगळ्या आयुधांचा वापर सुरु आहे. सुमारे 13 आमदार आपल्याकडे वळवण्यात यशस्वी झालेल्या पक्षाचा खासदार सहाव्या जागेवर जाणार आहे. भाजपचे राज्यसभेतील बहुमत वाढावे यासाठी केंद्रिय पातळीवरुनही या निवडणुकीकडे विशेष लक्ष आहे. आणि भाजपला रोकत आपली ताकद दाखवण्यासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीही पुर्ण प्रयत्न करत आहे त्यातुनच राज्यात पुन्हा हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळत आहे. आमदारांना असेच हाॅटेलमधे बंदिस्त करुन ठेवण्याचा प्रकार महिविकास आघाडी सरकारच्या स्थापनेच्या वेळीही पहायला मिळाला होता.

हेही वाचा : Who will win key RS seat ? राज्यसभेची सहावी जागा कोणाची? शुक्रवारी फैसला, सेनेच्या आमदारांना ट्रायडंटमध्ये हलविले

Last Updated :Jun 7, 2022, 10:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details