महाराष्ट्र

maharashtra

Bully Bai App Case : बुली बाई ॲप प्रकरणातील तिन्ही आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

By

Published : Jan 17, 2022, 11:41 AM IST

बुली बाई ॲप प्रकरणात ( Bully Bai App Case) मुंबई पोलिसांच्या सायबर पथकाने (Mumbai Police Cyber Squad) आतापर्यंत 3 आरोपींना अटक केली आहे. याल उत्तराखंड येथून अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींचा (Two accused arrested from Uttarakhand) समावेश असून बेंगलोर येथून अटक करण्यात आलेला एक आरोपी (An accused arrested from Bangalore) आहे. या तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे या आरोपींनी शुक्रवारी जामीन अर्ज करिता कोर्टात अर्ज केला होता यावर आज सोमवारी संयुक्त सुनावणी होणार आहे.

Bully Bai App Case
बुली बाई ॲप प्रकरण

मुंबई: बुली बाई ॲप प्रकरणात ( Bully Bai App Case) तिन्ही आरोपींनी बांद्रा न्यायालयात जामीन मिळावा यासाठी अर्ज करण्यात आला आहे. या प्रकरणातील या तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यानंतर या तीनही आरोपींनी जामीनासाठी रीतसर अर्ज केला आहे. 10 जानेवारी रोजी बेंगलोर येथून अटक करण्यात आलेले आरोपी विशाल कुमार झा याने जामीनासाठी अर्ज केला होता तर शनिवार श्‍वेता सिंग आणि मयंक रावल या दोन्ही आरोपींना जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे या अर्जावर आज सुनावणी होणार आहे.

तिन्ही आरोपीं कोविड सेंटरमधे
बुली बाई अ‍ॅप प्रकरणातील तिन्ही आरोपींना बांद्रा कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली असली तरी, या प्रकरणातील दोन आरोपींना कोरोनाची लागण झाल्यामुळे यांच्यावर कलिनातील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. आरोपी विशाल कुमार झा याला 10 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली. तर या प्रकरणातील दुसरा आरोपी मयंक रावल यालाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या आरोपींना कलिना तील कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. या प्रकरणातील महिला आरोपी श्‍वेता सिंग पण याच सेंटर मध्ये ठेवण्यात आलेले आहे.


काय आहे बुली बाई अ‍ॅप
मुस्लिम महिलांचा लिलाव करणारे एक अ‍ॅप सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. याच अ‍ॅपचे नाव आहे बुली बाई अ‍ॅप यावर कथितपणे मुस्लिम महिलांना टार्गेट करुन त्यांना अपमानित केले जात होते. या अ‍ॅपची माहिती समोर येताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात उद्रेक पहायला मिळाला. असा आरोप आहे की, हे बुली बाई अ‍ॅप मुस्लिम महिलांच्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन त्यांचे फोटो डाऊनलोड करुन लिलावासाठी पोस्ट करत होते.

100 मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड
पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुली बाई ॲपप्लिकेशनवर जवळपास 100 प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड करण्यात आले होते. ज्यामध्ये काही पत्रकार महिलांच्या फोटोचा अपलोड करण्यात आले होते. तसेच त्यांची बोलीही लावली जात होती. या प्रकरणात आतापर्यंत मुंबई सायबर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सायबर सेलला बुली बाईशी संबंधित 3 ट्विटर हँडलची माहिती मिळाली. पोलिसांनी हे ॲपप्लिकेशन तयार करणाऱ्या गुगलला पत्र लिहून हे ॲपप्लिकेशन बंद करण्याचे सांगितले होते. मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ते आता त्या सर्व महिलांना त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी बोलावत आहेत. तांत्रिक विश्लेषण करण्याचे कामही मुंबई पोलिसांकडून केले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details