महाराष्ट्र

maharashtra

Mumbai Sessions Court: नशेत छळ करणे म्हणजे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे होत नाही; मुंबई सत्र न्यायालयाचे निरीक्षण

By

Published : Dec 2, 2022, 10:03 AM IST

Mumbai Sessions Court: मुलुंड मधील राहणारे पीडित विवाहित महिला ममता चावडा ने 2015 मध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. या आरोपांमध्ये पती नरेश चावडाला अटक करण्यात आली होती. मुंबई सत्र न्यायालयाने Mumbai Sessions Court आरोपीची आरोपांमधून निर्दोष सुटका केली

Mumbai Sessions Court
Mumbai Sessions Court

मुंबई:मुलुंड मधील राहणारे पीडित विवाहित महिला ममता चावडा ने 2015 मध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. या आरोपांमध्ये पती नरेश चावडाला अटक करण्यात आली होती. मुंबई सत्र न्यायालयाने आरोपीची आरोपांमधून निर्दोष सुटका केली आहे. न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, जर दारूच्या नशेत पतीकडून पत्नीचा छळ होत असेल, तरी पत्नीला आत्महत्या प्रवृत्त केले असे सिद्ध होत नाही, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवत आरोपीची निर्दोष सुटका केली आहे.

निर्दोष सुटका करण्यात आली: 2015 मध्ये पत्नीची आत्महत्या केल्या प्रकरणात आरोपी पती नरेश चावडावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या प्रकरणात प्रमुख भूमिका असल्याचे कोणताही पुरावा नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे आरोपी पतीला निर्दोष सुटका करण्यात आली आहे. आरोपी पती जामिनावर बाहेर होता. पीडित विवाहित महिला ममता चावडा या महिलेने 14 जून 2015 रोजी त्यांच्या मुलुंडच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती.

आत्महत्येसाठी प्रवृत्त केले: पीडित महिलेच्या आई- वडिलांनी आरोप केला होता की, आरोपी दारू पिऊन पीडित महिलेला मारहाण करत असतं. आत्महत्या करण्यापूर्वी काही वेळा अगोदर पीडित महिला आणि तिचे पतीमध्ये भांडण झाले होते. असे असले तरी, आरोपींनी तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले असा कोणताही पुरावा नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. अशा प्रकारे ज्या परिस्थितीने मृत व्यक्तीला आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले. ते दाखविण्याची जबाबदारी फिर्यादीवर होती, असे न्यायालयाने म्हटले आहे.

घटनेबद्दल न्यायालयाने म्हटले: फिर्यादी साक्षीदारांच्या पुराव्यात ममता यांच्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. खरं तर पीडित महिला ममता चावडा आरोपींसोबत त्यांच्या आजीच्या घरातून रात्री आणि दुसऱ्या दिवशी लग्नाच्या घरी पोहोचल्यानंतर आरोपींकडून कोणतेही भांडण, मारहाण, शिवीगाळ झालेली नाही. त्या दुर्दैवी घटनेबद्दल न्यायालयाने म्हटले आहे. साक्षीदारांच्या साक्षीवरून न्यायालयाच्या लक्षात आले की, आरोपी आणि पीडितेने प्रेमविवाह केल्यानंतर ते भाड्याच्या घरात राहू लागले. मुंबई महानगरपालिकेत सफाई कामगार असलेल्या पीडित महिलेला महापालिकेने राहण्याची जागा दिली होती. परंतु ती तिच्या भाऊ आणि आजीने ताब्यात घेतली होती. या दोन्ही साक्षीदारांनी आरोपीविरुद्ध जबाब दिला होता.

साक्षीदारांनी आरोपीविरुद्ध जबाब दिला:कोर्टाने निदर्शनास आणून दिले की, आरोपीला त्याच्या घराच्या वापरासाठी आणि व्यवसायासाठी भाडे द्यावे लागले. तरीही त्याच्या पत्नीला बीएमसीने राहण्याची जागा दिली होती. न्यायालयाने पुढे सांगितले की पीडितेचा भाऊ सागर सरदारा आणि पीडितेची आजी विजया सरदारा हे आरोपींविरुद्ध नाराज होते. कारण त्यांना त्यांच्या पत्नीच्या नावावर असलेले घर खाली करायचे होते. जेणेकरून तो आपल्या कुटुंबासह तेथे राहू शकेल. आरोपीच्या अपेक्षांमध्ये चूक होऊ शकत नाही. कारण त्याला त्याच्या कुटुंबासह राहत असलेल्या घराचे भाडे देणे आवश्यक होते, असे न्यायालयाने म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details