महाराष्ट्र

maharashtra

Vasai Murder : पत्नीनेच काढला पतीचा काटा; पतीच्या हत्येची दिली 1 लाखात सुपारी

By

Published : Feb 1, 2023, 10:15 PM IST

Updated : Feb 1, 2023, 10:53 PM IST

पतीच्या हत्येसाठी एक लाख रुपयांची सुपारी देणाऱ्या पत्नीसह तिघांना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. मात्र, या हत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. अनैतिक संबंधातून ही हत्या झाली असा अंदाज वर्तविला जात आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा 2 च्या पोलिसांनी मुंबई या प्रकरणाचा उलगाडा केला आहे.

Vasai Murder
पत्नीनेच काढला पतीचा काटा

पत्नीनेच काढला पतीचा काटा

वसई :वसई जवळील नायगाव परिसरात पोलिसांना सापडलेल्या अद्यात इसमाच्या मृतदेहाचा अखेर उलगडा झाला आहे. मुंबईच्या गोरेगाव परिसरात राहणाऱ्या एका पत्नीने आपल्याच पतीची 1 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या घडविल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपिंना अटक केली आहे. कमरुद्दीन उस्मान अन्सारी असे मयत पतीचे नाव असून अशिया अन्सारी असे आरोपी पत्नीचे नाव आहे. गोरेगाव पूर्वेच्या भगत सिंग चाळीत हे दामपत्य राहत होते.

पत्नीने दिली सुपारी : पत्नी अशिया हिने तिच्या शेजारी राहणारे पती पत्नी बिलाल पठाण, सौफिया पठाण यांना एक लाख रुपयांची कमरुद्दीनला ठार मारण्यासाठी सुपारी दिली होती. त्यानुसार वसई जवळील नायगाव परिसरात त्याला नेवून दोघांनी धारदार शस्त्राने हत्या केली. तसेच झाडी झुडपात त्याचा मृतदेह फेकून दिला होता. त्यानंतर कमरुद्दीनची पत्नी अशिया हिनेच तो बेपत्ता असल्याची तक्रार बांगूरनगर पोलीस ठाण्यात दिली.

मृतदेह खाडीच्या पाण्यात फेकला : 27 जानेवारीला वालीव पोलिसांना हा मृतदेह सापडल्यानंतर त्याची ओळख पटविण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर होते. नायगाव रिक्षा स्टँडजवळील पुलाखाली सायंकाळी एका व्यक्तीचा मृतदेह खाडीच्या पाण्यात आढळून आला होता. वालीव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पाहणी केली असता, मयत व्यक्तीचा धारदार शस्त्राने खून करून मृतदेह तेथेच फेकून दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा 2 च्या पोलिसांनी मुंबई, ठाणे व आजूबाजूच्या परिसरातील पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मिसिंग तक्रारिंचा शोध घेतला होता. वालीव पोलिसांनी रविवारी खुनाचा गुन्हा दाखल केला.

प्रेम संबंधातून हत्या :परिसरातील नागरिकांकडून केलेल्या चौकशीत मयत कमरुद्दीनच्या घराच्या शेजारी राहणारे पती-पत्नी गुन्हा घडल्यापासून घरातून निघून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी या पती-पत्नीला गुजरात वापी परिसरातून ताब्यात घेतले. त्यांकडून केलेल्या चौकशीत त्यांनी कमरुद्दीनच्या हत्येची कबुली दिली असल्याची माहिती गुन्हे शाखा 2 चे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली. अनैतिक प्रेम संबंधातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

हेही वाचा -Teacher Arrested : झारखंडमधील शिक्षकाचा पर्दाफाश, माटुंगा पोलिसांनी शिक्षकाला ठोकल्या बेड्या

Last Updated :Feb 1, 2023, 10:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details