महाराष्ट्र

maharashtra

Dhanteras Gold Price : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याच्या किंमतीत घट; खरेदी वाढणार

By

Published : Oct 21, 2022, 4:18 PM IST

Gold Price Before Dhanteras: कोरोनानंतर निर्बंधमुक्त ही पहिली दिवाळी असणार आहे. यावर्षी केवळ दिवाळीत साडेपाचशे ते सहाशे कोटींची उलाढाल होणार असल्याचा अंदाज आहे. तर पण दिवाळीत सोन्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांनी देखील सोने खरेदी खरेदीला पसंती देण्यात येत आहे.

Gold Price Before Dhanteras
Gold Price Before Dhanteras

मुंबई:कोरोनानंतर निर्बंधमुक्त ही पहिली दिवाळी असणार आहे. यावर्षी केवळ दिवाळीत साडेपाचशे ते सहाशे कोटींची उलाढाल होणार असल्याचा अंदाज आहे. तर पण दिवाळीत सोन्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांनी देखील सोने खरेदी खरेदीला पसंती देण्यात येत आहे.

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याच्या किमतीत घट झाल्याने सोने खरेदी वाढणार

सोने खरेदीला ग्राहकांकडून अधिक पसंती मागील अडीच वर्ष कोरोना काळ असल्यामुळे कोणते ते सण साजरे करता येत नव्हते. मात्र यावर्षी करुणाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सर्व सार्वजनिक सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहे. त्यानंतर दहीहंडी असेल दसरा असेल किंवा गणेशोत्सव असेल. हे सर्व सण मोठ्या उत्साहात साजरे केले गेले. त्याचप्रमाणे दिवाळी हा सण देखील मोठा उत्साहात साजरी होणार आहे. या सणाच्या निमित्ताने धनत्रयोदशीच्या सोने खरेदीला ग्राहकांकडून अधिक पसंती दिली जात आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचा दर प्रति तोळे 53 हजार रुपयांच्या आसपास होता.

सोने व्यापारात उलाढाल मात्र धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याचा दर प्रति तोळे 51 हजार पाचशे रुपये झाला आहे. सोन्याच्या दर कमी झाल्यामुळे एन दिवाळीत लोकांकडून दिवाळीच्या मुहूर्तावर तो सोने खरेदी केलं जातच आहे. यासोबतच ज्यांच्या घरी लग्न आहेत, ते देखील आतापासूनच सोने खरेदीला पसंती देत आहेत. दर कमी झाल्यामुळे यावेळी सोन्याची विक्रमी खरेदी दिवाळीत होईल, अशी शक्यता इंडीयन बिलियन ज्वेलर असोसिएशनचे अध्यक्ष कुमार जैन यांनी व्यक्त केलं. दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदीला विशेष महत्त्व हिंदू धर्मात देण्यात आला आहे. धर्मासहित या सणाच्यावेळी इतर धर्मदेखील सोने खरेदीला मोठी पसंती देतात. तसेच कोरोनानंतर ही पहिलीच दिवाळी असल्यामुळे या दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात सोने व्यापारात उलाढाल केली जाईल, असे मत सोने व्यापाऱ्यांचे आहे.

दिवाळीच्या तोंडावर सोने बाजारात होणार मोठी उलाढाल कोरोनाच्यानंतर ही पहिलीच दिवाळी आहे. या दिवाळीला जवळपाचशे ते सहाशे कोटी रुपयांपर्यंतच्या सोने व्यापारात उलाढाल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या वर्षी ८० टन सोन्याची उलाढाल या दिवसांमध्ये झाली होती. मात्र ती तुला ढाल यावर्षी १२० टन होण्याची शक्यता आहे. सामान्यवेळी हीच उलाढाल २०० कोटी रुपयेपर्यंत असते. तसेच कोरोना येण्याआधी दिवाळीत ४०० कोटीपर्यंत उलाढाल होत होती. मात्र या वर्षी ती उलाढाल ६०० कोटी एवढी होण्याचा अंदाज आहे. मात्र येणाऱ्या काळात डॉलरच्या तुलनेने रुपया अजून घसरल्यास या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

लग्नासाठी सोन्याची खरेदी देखील दिवाळीत दिवाळीनंतर लग्न सराई सुर होणार आहे. देशभरात लग्न दिवाळी नंतर सुरू होतील. या वर्षी लगणाचे मुहूर्त देखील अधिक प्रमाणात आहेत. केवळ हिंदू धर्मात १५५ मुहूर्त आहेत. तसेच केवळ हिंदू धर्मात नाही तर सर्व धर्मात लग्न मोठ्या प्रमाणात पार पडणार आहेत. आणि सर्वच धर्मात लग्नसोहळाला सोने खरेदी केले जाते. म्हणून यावर्षी अधिक लग्नसोहळाची सोने खरेदी ही दिवाळीत केली जाण्याची शक्यता आहे. कोरोना काळात लोकांनी ५८ हजार रुपये तोळा किंमतीने सोने खरेदी केली होते. मात्र आतातर त्या पेक्षाही किंमत कमी आहे. त्यामुळे यावर्षी दिवाळीत देखील मोठी उलाढाल सोनेबाजारत होईल, अशी शक्यता इंडीयन बिलियन ज्वेलर असोसिएशनचे अध्यक्ष कुमार जैन यांनी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details