महाराष्ट्र

maharashtra

Arjuna Ranatunga meet Eknath Shinde : श्रीलंकन क्रिकेटपटू रणतुंगा यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट, भेटीमागील कारण आले समोर

By

Published : May 24, 2023, 1:37 PM IST

अर्जुन रणतुंगा एकनाथ शिंदे भेट
Arjuna Ranatunga meet Eknath Shinde ()

श्रीलंकेचे क्रिकेटपटू अर्जुन रणतुंगा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात येऊन भेट घेतली. त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना श्रीलंका दौऱ्यावर येण्याचे निमंत्रण दिले. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रणतुंगा यांच्या मुख्यमंत्री भेटीचे कारण राजकीय नसून व्यावसायिक असल्याचे समोर आले आहे.

मुंबई - शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर जगभरातील ३३ देशांनी शिवसेनेतील बंडाची दखल घेतल्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने मांडत आहेत. विदेशातील अनेक महनीय व्यक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी येत आहेत. अशातच श्रीलंकेचे सुप्रसिद्ध क्रिकेटपटू माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, भरत गोगावले, संजय शिरसाट आदी यावेळी उपस्थित होते.



श्रीलंका टीमचा कॅप्टन अर्जुन रणतुंगा म्हणाले, की अनेक दिवसांपासून भेटीला यायचे ठरवले होते. त्यानुसार आज भेट घेतली. श्रीलंका अडचणीत असताना भारताने खूप मदत केली. त्याबद्दल खूप आभारी आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांना श्रीलंकेला येण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले. मुख्यमंत्री शिंदे देखील श्रीलंकेत यायला इच्छुक आहे, असे रणतुंगा यांनी सांगितले. तर आमदार प्रताप सरनाईक यांनी, श्रीलंकेतील कोलंबोला येथील आठवणींना उजाळा दिला.

दोन्ही देशांमधील संबंध सुधारावे-सरनाईक म्हणाले, रामसेतूचे दगड आणि अवशेष बघितले. त्यामुळे राममंदिर निर्माणनंतर रामसेतू निर्माण व्हावे, अशी मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

श्रीलंकेतील संस्कृती आपल्या भारतासारखी आहे. त्याठिकाणचे लोक भारतीय दाक्षिणात्य भाषा बोलतात. रामसेतू बांधण्यात आल्यास दोन्ही देश जवळ येतील. त्यांच्यातील संबध सुधारतील-प्रताप सरनाईक

रणतुंगा यांचा आहे हा व्यवसाय-अर्जुन रणतुंगा यांची इलेक्ट्रिक वन लंका प्रायव्हेट लिमिटेड ही इलेक्ट्रिक व्हेईकल कंपनी आहे. ही कंपनी इलेक्ट्रिक वाहनांची किरकोळ विक्री करते. या संदर्भात रणतुंगा यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सूत्राने सांगितले. लवकरच याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत विषय चर्चेला घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी रणतुंगा यांना दिले. रणतुंगा यांनी यापूर्वी उद्योग मंत्री उदय सामंत यांची देखील भेट घेतली होती, असे सूत्रांचे म्हणणे आहे

हेही वाचा-

  1. Arvind Kejriwal Mumbai Visit : अरविंद केजरीवाल, भगवंत मान उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल
  2. Rs 2000 Note Withdrawal: 2 हजारांच्या नोटेने सोने बाजारपेठेची होतेय 'चांदी'
  3. Youth Voters In Maharashtra : युवा मतदारांची टक्केवारी वाढवण्यासाठी भाजपाचे विशेष प्रयत्न

ABOUT THE AUTHOR

...view details