महाराष्ट्र

maharashtra

Mumbai Crime : महिलांना व्हिडिओ कॉल करून दाखवायचा प्रायव्हेट पार्ट, वाचा काय झाले पुढे....

By

Published : Feb 21, 2023, 6:34 PM IST

Updated : Feb 21, 2023, 6:57 PM IST

गेल्या ३ वर्षांपासून व्हॉट्सअप डीपीवर मुलींचे फोटो पाहून व्हिडिओ कॉल करून त्यांना प्रायव्हेट पार्ट दाखवणाऱ्या सीरियल मॉलेस्टरला मुंबई मालाड पोलीस ठाण्याच्या सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या २७ वर्षीय तरुणावर ३५ हून अधिक महिलांना अश्लील व्हिडिओ आणि मेसेज पाठवल्याचा आरोप आहे. आरोपी फ्लिपकार्ट कंपनीचा डिलिव्हरी बॉय असल्याचे तपासात समोर आले आहे.

Mumbai Crime
Mumbai Crime

प्रकरणाचा तपास कसा केला याविषयी सांगताना पोलीस अधिकारी

मुंबई :ज्योतिराम बाबुराम मनसुडे (२७ वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीवर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात १० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. मात्र त्याला प्रथमच अटक करण्यात आली आहे. मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पीआय रवी अदाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासात असे समोर आले आहे की, २०१९ मध्ये महिलेसमोर असभ्य कृत्य त्याने केल्याची पहिली घटना होती.

व्हिडीओ कॉल करून दाखवायचा प्रायव्हेट पार्ट: त्यानंतर मालाड लिबर्टी गार्डनमध्ये राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेने मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत म्हटले आहे की, फ्लिपकार्टचा डिलिव्हरी बॉय तिला वारंवार व्हिडिओ कॉल करून त्याचा प्रायव्हेट पार्ट दाखवतो. तक्रारीनंतर मालाडचे सायबर अधिकारी धीरज बायकोस यांनी तपास केला असता आरोपी ज्योतिराम हा पुण्याचा रहिवासी असल्याचे आणि तो फ्लिपकार्ट कंपनीत कामावर असल्याचे निष्पन्न झाले.


अशा पद्धतीने शोधायचा महिलांचे नंबर : हा फ्लिपकार्ट डिलिव्हरी एजंट फेसबुकवर नोकरीच्या संधी असणाऱ्या ग्रुपमध्ये सामील व्हायचा. यानंतर महिलांचे व्हॉट्सअ‍ॅप नंबर शोधून त्यांना अश्लील व्हिडिओ कॉल करायचा. त्याने 30 पेक्षा अधिक महिलांना व्हॉटसअपवरून फोटो पाठविले आहेत. तो महिलांना महिलांचेच फोटो दाखवायचा असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी अशा रीतीने आवळल्या मुसक्या :१८ फेब्रुवारी रोजी मालाड पोलीस ठाण्यांतर्गत एका ३५ वर्षीय महिलेला अश्लील व्हिडीओ पाठवून तिला प्रायव्हेट पार्ट दाखवून वारंवार व्हिडीओ कॉल करत होता. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. पोलिसांच्या हाती लागलेल्या व्हिडिओमध्ये आरोपी अश्लील कृत्य करताना दिसत होता. इलेक्ट्रॉनिक पाळत ठेवण्याच्या मदतीने त्याला आयपीसी कलम ३५४ (महिलेचा विनयभंग) आणि धमकावणे (५०६) अंतर्गत अटक करण्यात आली.

तांत्रिक तपासामुळे आरोपी गजाआड :पोलिसांच्या माहितीप्रमाणे, तो महिलांना अश्लील व्हिडिओ पाठवायचा आणि व्हिडियो कॉलिंगवर खासगी भागसुद्धा दाखवायचा. मुंबई पोलिसांना याविषयी तक्रार प्राप्त झाल्यावर त्यांनी तांत्रिक पद्धतीने तपास करून अखेर आरोपीला अटक केली. ज्योतिराम बाबुराव मनसुले असे आरोपीचे नाव आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

पोलिसाचे अश्लील वर्तन : औरंगाबादमधील जवाहर नगर परिसरातील मयूरबन कॉलनी येथील महिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार एका पोलीस उपनिरीक्षकाने परिसरातील काही महिलांची 17 फेब्रुवारी, 2023 रोजी दारूच्या नशेत छेड काढली. महिलांच्या घराच्या भिंतीवर तो बॉल मारून खेळत होता. त्यावेळी तिथे असलेल्या महिलांकडे अश्लील नजरेने पाहून त्यांना त्रास देत होता. काही महिलांनी त्याला अडवल्यावर अश्लील भाषेत त्यांच्याशी वर्तन केले. यानंतर काही महिला एकत्र आल्यावर सर्वच महिलांना त्रास देत असल्याचे दिसून आले. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी जवाहर नगर पोलिसात आपला मोर्चा वळवला, पोलिसावर कारवाई करा, यासाठी रात्री उशिरापर्यंत महिलांनी पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या मांडला होता.


हेही वाचा:Printing fake notes : बनावट नोटा छापल्याप्रकरणी भाऊ बहिणीला अटक; फर्जी वेब सिरीजसारखा गुन्हा

Last Updated :Feb 21, 2023, 6:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details