महाराष्ट्र

maharashtra

Hapus Mango : हापूस आंब्याची पहिली पेटी एपीएमसीमध्ये दाखल

By

Published : Nov 25, 2022, 10:59 PM IST

हापूस आंब्याची ( Hapus Mango ) पहिली पेटी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ( Bombay Agricultural Produce Market Committee ) दाखल झाली आहे.

Hapus Mango
Hapus Mango

नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ( Bombay Agricultural Produce Market Committee ) हापूस आंब्याची ( Hapus Mango ) पहिली पेटी दाखल झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील देवगड तालुक्यातील कातवन या गावचे बागायतदार प्रशांत शिंदे, दिनेश शिंदे यांनी ही पेटी पाठवली आहे. बाजार समितीमधील व्यापारी अशोक हांडे यांच्याकडे देवगडवरून ही आंबापेटी विक्रीसाठी आली आहे.

आंब्याला साडेचार हजार रुपये प्रती डझन भाव -नुकतेच पदार्पण केलेल्या या हापूस आंब्याला साडेचार हजार रुपये प्रती डझन असा भाव मिळाला आहे. मार्केटमध्ये साधारणत: डिसेंबर ते जानेवारीमध्ये मुहूर्ताची पेटी विक्रीला येते. नोव्हेंबर महिन्यातच आंबा विक्रीसाठी आल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पेटीची विधिवत पूजा -शुक्रवारी पहिल्या पेटीची विधिवत पूजा करण्यात आली. हे आंबे पिकवून पहिल्यांदा सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण केले जाणार आहेत. बाजार समितीतील व्यापारी हांडे यांनी सांगितले की, या वर्षी पहिली पेटी लवकर आली असली, तरी आंब्याचा नियमित हंगाम फेब्रुवारीअखेर मार्चमध्येच सुरू होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details