महाराष्ट्र

maharashtra

Rape On Girl In Mumbai : बाप-लेकीच्या नात्याला कलंक! पित्यानेच केला मुलीवर बलात्कार, नराधम बापासह शेजाऱ्यास अटक

By

Published : Jun 24, 2023, 4:10 PM IST

Updated : Jun 24, 2023, 7:26 PM IST

सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर नराधम पित्याने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडिता गर्भवती असल्याचा प्रकार समोर आला आणि हा प्रकार उजेडात आला. याप्रकरणी नराधम बापासह शेजाऱ्यास टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे.

Mumbai Crime
मुलीवर बलात्कार

मुंबई :एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने तिचे वडील आणि शेजाऱ्याने वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. तिने तिच्या आईला घडलेला भयानक त्रास सांगितला. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी नराधम बापास शेजाऱ्यासह अटक केली आहे.



शेजारील व्यक्तीनेही केला बलात्कार :टिळक नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारी राहणाऱ्या 32 वर्षीय व्यक्तीने फेब्रुवारी 2023 मध्ये पीडितेच्या कुटुंबीयांना मुलीशी लग्न करण्यास इच्छुक असल्याबद्दल सांगितले. तेव्हापासून दोघांनीही एकमेकांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले. त्यानंतर त्याने पीडितेला आपल्या लैंगिक संबंध आवडीबद्दल सांगितले. पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात आरोप केला आहे की, तो नंतर तिच्याशी लग्न करेन असे म्हणत त्याने वारंवार तिच्यावर बलात्कार केला. मात्र, परिणामांची भीती असल्याने ती ही घटना तिच्या कुटुंबियांना सांगू शकली नाही.



मुलगी गरोदर असल्याचे समजले :28 फेब्रुवारीला पीडितेची आई कामानिमित्त बाहेर गेली होती, तेव्हा मुलगी वडिलांसोबत घरी होती. दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर वडिलांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिने केला. तरीही, ती तिच्या कुटुंबियांना किंवा मित्रांना ही बाब उघड करू शकली नाही. या आठवड्याच्या सुरुवातीला जेव्हा ती गरोदर असल्याचे समजले तेव्हा तिने हिंमत केली आणि सर्व काही तिच्या आईला सांगितले. त्यानंतर लगेचच आई आणि मुलगी दोघीही टिळक नगर पोलिस ठाण्यात गेल्या आणि शेजारी आणि वडिलांविरुद्ध तक्रार नोंदवली. दोघांना टिळकनगर पोलिसांनी अटक केली.



गुन्ह्यांची दिली कबुली: दोघांनाही पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी अटक केली. त्यांनी चौकशीत गुन्ह्यांची कबुली दिली असल्याचे टिळक नगर पोलिसांनी सांगितले. या दोघांविरुद्ध भारतीय दंड संविधान कलम ३७६ (बलात्कार), ३७६ (२) (एफ),376 (2) (j) आणि पोस्को ऍक्ट कलम 4, 6, 8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा -

  1. Jalebi Baba Rape Case : जलेबी बाबाचा 120 महिलांवर बलात्कार; न्यायालय कोणती शिक्षा सुनावणार? उद्या निकाल...
  2. Auto Driver Try To Rape On Girl : रिक्षा चालकाचा तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न, पुण्यातील घटनेने खळबळ
  3. UP Crime News : इंस्टाग्रामवर तरुणीशी मैत्री करून केला बलात्कार, अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल
Last Updated :Jun 24, 2023, 7:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details