महाराष्ट्र

maharashtra

Dummy Student Racket : महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षेतही डमी रॅकेट सक्रिय

By

Published : Dec 5, 2022, 2:04 PM IST

पिंपरी चिंचवड पोलीस भरतीत नुकतेच हाय टेक उपकरणे असणाऱ्या टोळीतील ( Dummy Student Racket) ५६ आरोपींना अटक करण्यात आली. स्पर्धा परीक्षा समितीच्या दिलेल्या यादीनंतर म्हाडा भरती मधील ६० उमेदवारांच्या नियुक्त्या स्थगित करण्यात आल्या. सदोष परीक्षा पद्धतीमुळे यात (Dummy Student Racket ) डमी गँग सक्रिय असल्याचा संशय (Dummy student gang suspected to be active) स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने (Competitive Exam Coordinating Committee) घेतला (Latest news from Mumbai) आहे.

Dummy Student Racket
परीक्षेतही डमी रॅकेट सक्रिय

मुंबई :जुलै 2022 मध्ये गट 'ब' आणि 'क' तसेच 'ड' संवर्गातील पद भरतीसाठी (Recruitment) महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (Maharashtra State University of Health Sciences) परीक्षा देखील झाल्या. त्याचा निकाल 3 नोव्हेंबर रोजी लागला. मात्र सदोष परीक्षा पद्धतीमुळे यात (Dummy Student Racket ) डमी गँग सक्रिय असल्याचा संशय (Dummy student gang suspected to be active) स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने (Competitive Exam Coordinating Committee) घेतला आहे. शासनाने त्याबाबत कारवाई (Latest news from Mumbai) करण्याची त्यांनी आज मागणी देखील केली आहे.

डमी रॅकेटची कार्यपद्धती :पिंपरी चिंचवड पोलीस भरतीत नुकतेच हाय टेक उपकरणे असणाऱ्या टोळीतील ५६ आरोपींना अटक करण्यात आली, स्पर्धा परीक्षा समितीच्या दिलेल्या यादीनंतर म्हाडा भरती मधील ६० उमेदवारांच्या नियुक्त्या स्थगित करण्यात आल्या. तलाठी, आरोग्य भरती, MIDC अशा सर्व परीक्षेत डमी रॅकेट अस्तित्वात होते. मुख्यत्वे औरंगाबाद-जालना आणि मराठवाड्यातून चालणाऱ्या या रॅकेटकडे शेंगदाण्याच्या आकाराइतके लहान ब्लूटूथ असून ते कानात ठेवले जाते. एटीएम कार्ड सारखे मास्टर कार्ड आणि छोट्या कॅमेऱ्याद्वारे पेपर बाहेर पाठवून, बाहेर बसणाऱ्या सोल्व्हर करून उत्तरे मागविली जातात. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने दिलेल्या अधिकृत पोलीस तक्रारीनंतरच आरोग्य भरती पेपरफुटी, म्हाडा भरती घोटाळा, TET घोटाळा समोर येऊ शकला. तर म्हाडा फेरपरीक्षेत आम्ही दिलेल्या सर्व डमी उमेदवारांवर गुन्हे दाखल होऊ शकले यासोबतच इतर अनेक परीक्षांमध्ये या रैकेट मधील डमी उमेदवार आम्ही पकडून दिले आहेत.

भरती घोटाळ्यावर समितीचे मत :ह्या भरती प्रक्रिये नेमके काय गैरप्रकार झाले त्याबाबत समितीचे राहुल कोठेकर म्हणाले," महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षेतही सदर डमी रॅकेट सक्रिय असल्याचा आमचा संशय आहे. या रॅकेट मधील मिळते-जुळते अनेक नावे निवड यादीत दिसत असल्याने आमचा संशय बळावला आहे. निवड यादीच्या pdf मधील संशयित डमी उमेदवारांच्या नावाला आम्ही हायलाइट केले. ती पूर्ण यादी आम्ही आपल्याला पाठवीत आहोत. हायलाइट केलेल्या सर्व उमेदवारांचे परीक्षा देतानाचे CCTV फुटेज तपासत आम्ही दिलेल्या सर्व डमी उमेदवारांची शहानिशा करण्यात यावी. यात एखादाही उमेदवार दोषी आढळल्यास आपल्या विभागातर्फे तशी तक्रार सायबर पोलिसात देण्यात येऊन सखोल तपास करण्याची विनंती पोलीस विभागाला करण्यात यावी. " परीक्षा नियंत्रक महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक हे आता काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details