महाराष्ट्र

maharashtra

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित टूर सर्किट

By

Published : Nov 27, 2022, 5:43 PM IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन ( Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvana Day) आणि संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने त्यांच्या जीवनाशी निगडीत मुंबईतील महत्त्वाची स्थळे व बौद्ध लेण्यांवर आधारित टूर सर्कीट तयार केले आहे. या टूर सर्किटमुळे जनतेला त्यांच्या जीवनाविषयी माहिती मिळण्यास मदत होईल असा दावा पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केला ( Circuit Based Tour Of Dr Babasaheb Ambedkar life ) आहे.

Babasaheb Ambedkar
बाबासाहेब आंबेडकर

मुंबई :भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत मुंबईतील महत्त्वाची स्थळे व बौध्द लेण्यांवर आधारित टूर सर्कीट दि. 3, 4, 7 व 8 डिसेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आले आहे. असून या टूरमध्ये चैत्यभूमी, राजगृह, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, बीआयटी चाळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, वडाळा या स्थळांचा समावेश ( Circuit Based Tour Of Dr Babasaheb Ambedkar life ) आहे. यासंदर्भात बाबासाहेबांनी सुरू केलेल्या पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आनंद व्यक्त केला आहे. बाबासाहेबांची खूर्ची आजही या महाविद्यालयात असून त्याबाबत उपप्राचार्या विद्या सतीश बोरुळकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

कसा असणार आहे उपक्रम : हा उपक्रम ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने पर्यटकांसाठी भविष्यात उपलब्ध करण्यात येणार आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ( Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvana Day) राज्यातून तसेच परराज्यातून चैत्यभूमी दादर येथे मोठ्या संख्येने अनुयायी आणि पर्यटक, अभिवा‍‌दन करण्यासाठी दरवर्षी भेट देत असतात. डॉ. आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत स्थळे तसेच बौद्ध लेणी यांचे दर्शन घडविण्यासाठी हा सर्कीट बनवण्यात आला आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ( Tourism Minister Mangalprabhat Lodha announcement )दिली.

चैत्यभूमीवर उभारणार माहिती स्टॉल : “पर्यटन संचालनालयाद्वारे महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी दादर येथे स्टॉल उभारुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीटची माहिती देण्यात येणार आहे. हे सर्कीट पर्यटन संचालनालय, मुंबई टूर गाईड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क व महाराष्ट्रामधील मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या सहा जिल्ह्यात पर्यटकांसाठी राबविण्यात येणार आहे. अशी माहिती पर्यटन सचिव सौरभ विजय यांनी दिली.

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details