महाराष्ट्र

maharashtra

Diwali 2023 : मुंबईत हवेची गुणवत्ता घसरली; यंदा प्रदूषण विरहित फटाक्यांना बाजारात मागणी

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 11, 2023, 6:47 PM IST

Updated : Nov 11, 2023, 10:36 PM IST

Diwali 2023 : मुंबईत वाढलेलं प्रदूषण (Air Pollution) आणि हवामानाची खराब झालेली गुणवत्ता पाहता बहुतांश मुंबईकरांनी यंदा प्रदूषण विरहित फटाके फोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं यंदा फटाके विक्रेत्यांनीही मोठ्या प्रमाणात प्रदूषण विरहित फटाके विक्रीला ठेवले आहेत. मुंबईतील दादरच्या बाजारात (Dadar Market) मोठ्या प्रमाणात या फटाक्यांची विक्री सुरू आहे.

Diwali 2023
दिवाळी 2023

दिवाळीत प्रदूषण विरहित फटाके फोडताना मुंबईकर

मुंबईDiwali 2023 : दिवाळी (Diwali Festival) म्हणजे रोषणाई, रांगोळी, फुलांची सजावट, फराळ आणि फटाके. दिवाळीत दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे फटाके फोडले जातात. या फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी आणि वायू प्रदूषण (Air Pollution) होत असतं. यंदा मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली आहे. मुंबईकरांना खराब हवेमुळं अनेक श्वसनाच्या रोगांना बळी पडावं लागत आहे. अशा स्थितीत मुंबईकरांनी कमीत कमी फटाके फोडावे तसंच प्रदूषण विरहित फटाके फोडण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहन मुंबई महानगरपालिका आणि रुग्णालयांच्या वतीनं करण्यात आलं आहे. मुंबईकरांनीही या आवाहनाला प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील दादर ही सर्वात मोठी बाजारपेठ (Dadar Market) मानली जाते. या बाजारात सध्या शोभेच्या आणि आवाजांच्या फटाक्यांसोबतच कमी प्रदूषण करणारे फटाके विक्रीला ठेवण्यात आले आहेत.


दरवर्षी दिवाळीनिमित्त बाजारात विविध प्रकारचे फटाके विक्रीसाठी उपलब्ध असतात. यंदा, मात्र मुंबईकरांनी राज्य सरकार आणि महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रदूषण विरहित फटाके खरेदीला पसंती दिली आहे. त्यामुळे प्रदूषण विरहित फटाके यंदा आम्ही विक्रीसाठी ठेवले आहेत. यात कमी धूर निर्माण होतो. त्यामुळे असे फटाके बाजारात मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. - विकास जयस्वाल फटाके विक्रेता



फटाके विक्रीवर परिणाम नाही :बाजारामध्ये अतिशय उत्साह आणि तेजी आहे. नागरिक मोठ्या प्रमाणावर फटाके खरेदीसाठी येत आहेत. न्यायालयाच्या निर्णयानुसार केवळ आठ ते दहा या वेळेत फटाके फोडण्याची परवानगी आहे. मात्र त्याचा व्यवसायावर फारसा परिणाम झालेला नाही. एकूणच मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता खालावली असली तरी दिवाळीच्या उत्साहावर जराही कमतरता जाणवत नाही. उलट नागरिक प्रदूषण विरहित फटाके खरेदी करून आपला आनंद साजरा करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Last Updated : Nov 11, 2023, 10:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details