महाराष्ट्र

maharashtra

IIT Mumbai: डेटा अनालिटिक्स आणि कन्सल्टिंग या दोन क्षेत्रात आयआयटी मुंबई नोकरीत टॉपमध्ये; सॉफ्टवेअरच्या शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये आकर्षण

By

Published : Feb 12, 2023, 2:56 PM IST

भारतामधील प्रमुख आयआयटी या शिक्षण संस्थांमध्ये मुंबई ही शिक्षण संस्था सातत्याने विविध अभ्यासाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या, अभियांत्रिकी क्षेत्रात आणि शोधाच्या क्षेत्रामध्ये भारतामधून पुढाकार घेत नाव कमवत आहे. त्यासाठीच अश्या संस्थांची स्थापना केली गेली आहे. आता मात्र सांख्यिकी विश्लेषण आणि सल्ला या दोन महत्त्वाच्या क्षेत्रामधून मुंबई आयआयटी येथून 33 टक्क्यांपेक्षा अधिक नोकऱ्यांची भरती झाली आहे. त्यामुळे या दोन क्षेत्राला गेल्या पाच वर्षांमध्ये प्रचंड वाव मिळाल्याचे महत्त्वाच्या शोध अभ्यासातून समोर आले आहे.

IIT Mumbai
आयआयटी मुंबई नोकरी

मुंबई :आयआयटी मुंबई या ठिकाणी उच्च शिक्षणातील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान आणि संगणक व माहिती व तंत्रज्ञान अशा मुख्य क्षेत्रामध्ये गेल्या 15 वर्षात बऱ्यापैकी गुंतवणूक केंद्र शासनाने केलेली होती. त्याचा परिणाम आज दिसत आहे की, 2014 ते 2018 या पाच वर्षांमध्ये किती प्रमाणात कोणत्या कोणत्या क्षेत्रांमध्ये नोकऱ्या झाल्या आहे. हे एका महत्त्वाच्या शोध अभ्यासून समोर आलेले आहे. आयआयटीच्या संदर्भातील एका शोधअभ्यास गटाने याबाबतचा अहवाल प्रस्तुत केला. त्यामध्ये हा शोध नमूद करण्यात आलेला आहे.


वर्षाला आठ लाखापेक्षा अधिक कमाई :आयटी मुंबईमधून जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन उत्तीर्ण होतात, त्यांना दरवर्षाला दहा लाखापेक्षा अधिक वेतन मिळते. म्हणजे याचाच अर्थ ते आपली एका वर्षाची कमाई तेवढी करतात, कारण त्यांनी जे शिक्षण आयआयटी मुंबई या ठिकाणी घेतलेला असते. आपली स्वतःची कल्पनाशक्ती त्यामध्ये ओतून मेहनत घेऊन ते दर वर्षाला अशी कमाई करतात. तसेच याच संदर्भात सल्लागार क्षेत्रामध्ये देखील जवळजवळ वर्षाला आठ लाखापेक्षा अधिक कमाई या क्षेत्रात नोकरी करणाऱ्या उमेदवारांना मिळालेली आहे. म्हणजेच या दोन महत्त्वाच्या मूलभूत क्षेत्रांमध्ये लक्ष दिल्यामुळे आणि त्याचा प्रसार आणि प्रचार झाल्यामुळे विद्यार्थी देखील त्या क्षेत्राकडे आकर्षित झाल्याचे दिसत आहे.



अधिकाधिक नोकरी पटकावणारे विद्यार्थी : रिसर्च डेव्हलपमेंट, ग्राहक वस्तू बाजारपेठ क्षेत्र असेल, याच्यामध्ये वार्षिक 16 लाखापेक्षा अधिक कमाई आहे. संशोधन व विकास क्षेत्रामध्ये 12 लाखापेक्षा अधिक वार्षिक कमाई आहे. वित्त विभागात वार्षिक 12 लाखापेक्षा अधिक पॅकेज विद्यार्थ्यांना मिळत आहे. त्यापेक्षा सांख्यिकी विश्लेषण आणि सांख्यिकी सल्लागार या दोन क्षेत्रांमध्ये मात्र अधिकाधिक नोकरी पटकावणारे विद्यार्थी आयआयटी मुंबईचे ठरलेले आहेत. म्हणजे सॉफ्टवेअरसाठी आयआयटी मुंबईमधील शिकलेल्या विद्यार्थ्यांसाठी 20 टक्के नोकऱ्या होत्या. त्यापैकी तेरा टक्के वाटा आयआयटी मुंबईच्या पदवीधरांनी व्यापलेला आहे, हे लक्षणीय आहे. हे मागील पाच वर्षांमध्ये झालेले आहे. 2014 ते 2018 या काळात संदर्भातील शोध अभ्यास गटाने या संदर्भातला जो शोध केला त्यातून ही माहिती समोर आलेली आहे.


प्रगती करण्याची संधी :या संदर्भात महाराष्ट्र स्टुडन्ट असोसिएशनचे विद्यार्थी नेता विकास शिंदे यांच्यासोबत ईटीव्ही भारत वतीने संवाद साधला असता त्यांनी नमूद केले की, पंडित नेहरूंनी स्वातंत्र्यानंतर मुंबई आयआयटी सारख्या ज्या संस्था स्थापन केल्या. त्या संस्था स्थापन करताना त्यामध्ये मूलभूत सुविधा विज्ञान तंत्रज्ञान यासाठी प्रचंड प्रमाणात निधी दिला. आणि मागच्या वीस वर्षांमध्ये ज्या रीतीने संस्थात्मक पद्धतीने आयटी मुंबईने वाटचाल केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या क्षेत्रामध्ये प्रगती करण्याची संधी मिळाली. याबाबत आम्हा विद्यार्थी संघटनेला आनंदच आहे, मात्र गरीब आणि दुर्बल आणि सामाजिक वंचित घटकातील विद्यार्थ्यांना देखील यामध्ये स्थान मिळायला हवे. त्यासाठी देखील केंद्र शासनाने प्रयत्न करायला पाहिजे.


शासनाने प्रयत्न करायला हवे : तर प्रोफेसर डॉक्टर मधु प्रसाद यांनी ईटीव्ही भारतसोबत संवाद साधताना सांगितले की, शासकीय शिक्षण संस्थांमधून प्रचंड बुद्धिमत्तेचे विद्यार्थी घडतात, हे जर याच्यातून सिद्ध झाले; तर मग शासकीय शालेय स्तरावर, माध्यमिक स्तरावर देखील बुद्धिमान विद्यार्थी घडू शकतात. फक्त सरकारने शासकीय निधी भरघोस रीतीने देण्याची गरज आहे. तसे वातावरण द्यावे आणि महिलांची अनुसूचित जाती जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्यनसमूह अशा सर्व सामाजिक, आर्थिक, धार्मिक दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना देखील या ठिकाणी संधी मिळण्यासाठी शासनाने प्रचंड प्रयत्न करायला हवेत.

हेही वाचा : Integrated Stress Response : इंटिग्रेटेड स्ट्रेस रिस्पॉन्समुळे कर्करोगाच्या पेशींचा होऊ शकतो मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details