महाराष्ट्र

maharashtra

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव साधेपणाने साजरे करा, मुख्यमंत्री ठाकरे यांचे आवाहन

By

Published : Sep 23, 2020, 10:35 PM IST

मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, स्वच्छता या सर्व बाबींची काळजी घ्यावी, जेणेकरून आपण सर्वजण सर्वांच्या सहभागातून कोरोनाचा प्रसार रोखू शकू, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री ठाकरे
मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई- येत्या १७ ते २५ ऑक्टोबर दरम्यान नवरात्री, दुर्गापूजा, विजयादशमी (दसरा) हे सण साजरे होणार आहेत. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सण साधेपणाने साजरे करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

गणपती उत्सवादरम्यान ज्या प्रकारे सहकार्य केले, त्याच प्रकारे या सणांमध्ये देखील सर्वांनी सहकार्य करावे. जेणेकरून कोरोनाचा प्रसार थांबवता येईल. लोकांनी गर्दी न करता गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्री उत्सवही साधेपणाने साजरे करावे. कोरोनासंदर्भातील शासनाने घातलेल्या सूचना, मार्गदर्शन, दक्षता यांचे पालन करावे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, स्वच्छता या सर्व बाबींची काळजी घ्यावी, जेणेकरून आपण सर्वजण सर्वांच्या सहभागातून कोरोनाचा प्रसार रोखू शकू, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. त्याचबरोबर, गणपती उत्सव साजरा करण्याबाबत जसे परिपत्रक शासनाने काढले होते. त्याचप्रमाणे या सणांबाबत देखील लवकरच मार्गदर्शक परिपत्रक काढण्यात येणार आहे.

हेही वाचा-सारा अली खान, श्रद्धा कपूर यांच्या घरी एनसीबीचे समन्स पोहोचले

ABOUT THE AUTHOR

...view details