महाराष्ट्र

maharashtra

CM Shinde On Cleanliness Campaign : पंतप्रधान मोदींमुळेच स्वच्छता मोहिमेला जनचळवळीचे स्वरूप - मुख्यमंत्री शिंदे

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2023, 5:25 PM IST

CM Shinde On Cleanliness Campaign: राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची उद्या जयंती (Mahatma Gandhi Jayanti). या पार्श्वभूमीवर मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे स्वच्छतेसाठी आज 'एक तारीख, एक तास' राज्यस्तरीय मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः झाडू हातात घेऊन (Cleanliness Mission) श्रमदान केले. 'सुंदर महाराष्ट्र, सुंदर भारत' घडवण्यासाठी आपण टाकलेले हे मोठे पाऊल असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच आज स्वच्छता मोहिमेला जनचळवळीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहे.

CM Shinde On Cleanliness Campaign
मुख्यमंत्री शिंदे

स्वच्छता मोहिमेविषयी सांगताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबईCM Shinde On Cleanliness Campaign:आजच्या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दीपक केसरकर, इस्रायलचे कौन्सिल जनरल जनरल कोबी, कोस्टगार्डचे वरिष्ठ अधिकारी, अभिनेते नील नितीन मुकेश, पद्मिनी कोल्हापुरे, सुबोध भावे देखील उपस्थित होते. मान्यवरांनी गिरगाव चौपाटी येथे स्वतः झाडू लावत श्रमदान केले.

मुख्यमंत्री शिंदे नागरिकांशी हात मिळविताना

स्वच्छता मोहिमेला जनचळवळीचे स्वरूप:15 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून स्वच्छतेचे जाहीर आवाहन केले. एवढ्यावर ते थांबले नाही तर दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीला आता झाडू घेऊन रस्त्यावर उतरले. त्यावेळेस अनेकांनी फोटो काढण्यासाठी हा 'स्टंट' असल्याचे म्हटले होते. त्यावेळेस नरेंद्र मोदी यांनी 'स्वच्छ भारत अभियाना' संदर्भात केलेल्या आवाहनाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर टीका करणाऱ्यांचे तोंड बंद झाले. याचा परिणाम आपल्याला पूर्ण देशात आज दिसत आहे. घरातील साफसफाई असेल घराच्या परिसरातील, नाल्यांची साफसफाई, गल्ल्यांची सफाई आणि सार्वजनिक शौचालयाची साफसफाई असेल हे सर्व आरोग्याशी निगडित आहेत. यावर सर्वांनी लक्ष केंद्रित केले. स्वच्छता मोहिमेत देशभरासह राज्यभरात लोकांनी सहभाग नोंदविला आहे. आता ही चळवळ उभी राहिली आहे. 'स्वच्छ भारत मोहीम' ही एक प्रकारे लोकचळवळ आणि जनचळवळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच 'भारत स्वच्छता मोहिमे'ला जनचळवळीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. स्वच्छतेसाठी 'एक तारीख, एक तास' मोहिमेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.



सार्वजनिक स्वच्छतेसोबतच राजकीय सफाई:उद्या (सोमवारी) महात्मा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर आज राज्यभर लोकसहभागातून 'स्वच्छता मोहीम' राबविण्यात येत आहे. आपण फक्त रस्ते साफसफाई करत नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'स्वच्छ भारत अभियाना'ची प्रेरणा घेऊन सर्वच ठिकाणी स्वछता करत आहोत. याला 'सुंदर महाराष्ट्र, सुंदर भारता'ची सुरुवात म्हणता येईल. सार्वजनिक स्वच्छते सोबतच पंतप्रधान मोदींनी राजकीय सफाई केली. म्हणजेच भ्रष्टाचाराची सफाई केली असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. गेल्या 50-60 वर्षांमध्ये देशातील राज्यकर्त्यांना करता आले नाही ते पंतप्रधान मोदी यांनी 8-9 वर्षांमध्ये करून दाखवले. आपल्या देशाचे नाव जगात गाजविले. याचा प्रत्यय आपल्याला दिल्लीतील 'जी 20 परिषदे'मध्ये पाहायला मिळाला. या मोहिमेमध्ये राज्यभर 72 हजार पेक्षा जास्त ठिकाणी 'स्वच्छतेची मोहीम' राबविण्यात येत आहे. 'स्वच्छता मोहीम' ही कागदावर नको तर फील्डवर जाऊन काम दिसले पाहिजे असे, आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री शिंदे आणि राज्यपाल रमेश बैस गिरगाव चौपाटीवर स्वच्छता करताना

हेही वाचा:

  1. PM Narendra Modi Pune Visit : दोन महिन्यात पंतप्रधान दुसऱ्यांदा पुणे दौऱ्यावर, लोकसभा निवडणुकीपूर्वी विशेष लक्ष
  2. Shreyas Talpade Cleanliness Campaign : श्रेयस तळपदेच्या उपस्थिती वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता अभियान; पाहा व्हिडिओ
  3. Swachh Bharat Mission : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियानाला लोक चळवळीत परिवर्तित केलं - देवेंद्र फडणवीस

ABOUT THE AUTHOR

...view details