महाराष्ट्र

maharashtra

Yes Bank DHFL Scam : लष्करी डॉक्टर पथकाकडून अविनाश भोसलेंच्या तपासणीवर सीबीआय ठाम, जे जे आणि सेंट जॉर्ज डॉक्टरांच्या अहवालावर आक्षेप

By

Published : Jan 21, 2023, 8:06 AM IST

डीएचएफएल आणि येस बँक प्रकरणातील आरोपी पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांच्या आरोग्य तपासणीसाठी AIIMS डॉक्टरांची समितीची स्थापना करण्याची याचिका दाखल करण्यात आली होती. सुनावणी दरम्यान सीबीआयने अविनाश भोसले यांच्या जे जे आणि सेंड जॉर्ज रुग्णालयाकडून दाखल करण्यात आलेल्या अहवालावर आक्षेप घेतला आहे. तसेच नेव्ही, नौदल, आणि आर्मी यांच्यातील तज्ञ डॉक्टरांच्या समिती स्थापन करून अहवाल कोर्टासमोर सादर करण्याची विनंती सीबीआयचे विशेष सरकारी वकील अमरदीप सिंग यांनी केली आहे.

Avinash Bhosle
अविनाश भोसले

मुंबई :सीबीआयच्यावतीने वकील अमरदीप सिंग यांनी युक्तिवाद करताना अविनाश भोसले यांच्या आरोग्य संदर्भात जे जे रुग्णालय आणि सेंट जॉर्ज रुग्णालयाकडून देण्यात आलेला अहवाला आक्षेप घेतला. अविनाश भोसले यांच्या आरोग्याची तपासणी दिल्लीतील तज्ञ एम्स रुग्णालयामार्फत अथवा नेव्ही आणि आर्मी यांच्या रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत करण्यात यावी असा युक्तिवाद केला. त्यावर न्यायाधीश एम जी देशपांडे यांनी रिपोर्ट राज्य सरकारच्या सरकारी हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने दिला आहे, यावर आक्षेप घेण्याचे काय कारण? असा प्रश्न विचारला असता. रिपोर्टमध्ये अविनाश भोसले यांना सहानुभूती दिसत आहे असे म्हणण्यात आले.



25 जानेवारीला सुनावणी : कोणत्या डॉक्टरांमार्फत चौकशी करायची आहे. या संदर्भातील डॉक्टरांची यादी न्यायालयासमोर सादर करा असे निर्देश न्यायाधीशांनी दिले आहे. त्यानंतर या प्रकरणात पुढील सुनावणी आणि निर्णय देण्यात येईल त्यामुळे सीबीआयला या तज्ञ डॉक्टरांची यादी 23 जानेवारीपर्यंत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात दाखल करायची आहे. आता 25 जानेवारीला यावर सुनावणी होणार आहे.




येस बँक आणि डीएचएफएल गैरव्यवहार : येस बँक आणि डीएचएफएल प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले अविनाश भोसले यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे मंडळ स्थापन करावे अशी मागणी सीबीआयने केली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने मुंबईतील विशेष न्यायालयात धाव घेतली आहे. येस बँक आणि डीएचएफएल प्रकरणातील आरोपी अविनाश भोसले यांची ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली आरोग्य तपासणी करण्याची विनंती करण्यात आली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अंतर्गत एक मंडळ स्थापन करावे असेही सीबीआयचे म्हणणे आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयने गेल्या वर्षी 26 मे रोजी अटक केली होती. नंतर अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांना ताब्यात घेतले होते. ते सध्या न्यायालयीन कोठडीत असून ऑक्टोबरपासून रुग्णालयात दाखल आहेत.



एकूण 415 कोटींच्या मालमत्तेवर टाच : ईडीने येस बँक आणि डीएचएफएल गैरव्यवहार प्रकरणात एकूण 415 कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली होती. ही मालमत्ता पुण्यातील व्यावसायिक अविनाश भोसले आणि बांधकाम व्यावसायिक संजय छाब्रिया यांच्याशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत होते. ईडीने भोसले यांच्याशी संबंधित 164 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर तर छाब्रिया यांच्याशी संबंधित 251 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली. येस बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राणा कपूर यांनी डीएचएफएलला 3 हजार 983 कोटी रुपये कर्ज स्वरूपात दिले होते. यातील 600 कोटी रुपये कपूर कुटुंबीयांचे नियंत्रण असलेल्या डू इट अर्बन वेंचर्स इंडिया प्रा. लि.कंपनीला कर्जाच्या रूपाने देण्यात आले होते. तर वांद्रे रेक्लेमेशन प्रकल्पासाठी येस बँकेने आणखी 750 कोटींचे कर्ज डीएचएफएल कंपनीच्या समूहातील आर.के.डब्ल्यू डेव्हलपर प्रा. लिमिटेडला दिले. ती रक्कम कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांनी इतरत्र वळवली.


68 कोटी रुपये सल्ला शुल्क : याप्रकरणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर सीबीआयने या रकमेबाबत अधिक तपास केला असता गैरव्यवहारातील 68 कोटी रुपये भोसले यांना सल्ला शुल्क म्हणून मिळाले. भोसले यांना 3 प्रकल्पांसाठी 2018 मध्ये ही रक्कम मिळाली होती. त्यातील एव्हेन्यू 54 आणि वन महालक्ष्मी हे दोन प्रकल्प बांधकाम व्यावसायिक संजय छाब्रिया यांनी विकसित केले होते. भोसले यांना वरळीतील एका झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातही सल्ला शुल्क रक्कम मिळाली होती. प्रकल्पाचा संभाव्य खर्च, वास्तुविशारद आणि अभियांत्रिकी आराखडा, प्रकल्प बांधकाम आणि करार, वित्तीय मूल्यांकन आणि संरचना आदी गोष्टींबाबत भोसले यांच्या कंपन्यांकडून सल्ला देण्यात आल्याचे दाखवण्यात आले होते. पण भोसले यांच्या कंपन्यांकडून अशी कोणतीही सुविधा देण्यात आली नसल्याचे सीबीआयच्या तपासात निष्पन्न झाले. संजय छाब्रिया यांच्या रेडियस ग्रुपने डीएचएफएलकडून घेतलेल्या दोन हजार कोटी रूपयांच्या कर्जातील 292 कोटी 50 लाख रुपये भोसले यांच्यामार्फत इतरत्र वळवण्यात आले होते. दोन कंपन्यांमार्फत ती रक्कम वळवण्यात आल्याचा आरोप आहे.



काय आहे प्रकरण : पुण्याचे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना काल गुरुवारी रात्री CBI कडून अटक करण्यात आली. DHFL प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. यातूनच त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षी जून 2021 मध्ये अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांच्या नावावर असलेली तब्बल 40 कोटी 34 लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली होती. विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. DHFL घोटाळा प्रकरणानंतर त्यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. अविनाश भोसले आज कोट्यवधी रुपयांच्या एबीआयएल ग्रुपचे मालक आहेत. रिअल इस्टेट किंग अशी त्यांची पुण्यामध्ये ओळख आहे. अविनाथ भोसले यांच्या ओळखीतील लोक सांगतात की 80 च्या दशकात ते रिक्षा चालवत असत. बांधकाम व्यवसायात आल्यानंतर सुरुवातीला कंत्राटदार ते आता पुण्यातील रिअल इस्टेट किंग अशी त्यांची ओळख आहे.




हेही वाचा :Yes Bank DHFL Fraud : येस-बँक डीएचएफएल फसवणूक प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; एकूण 415 कोटींची मालमत्ता जप्त.

ABOUT THE AUTHOR

...view details