महाराष्ट्र

maharashtra

Mamata Banerjee: राष्ट्रगातीचा अवमान प्रकरण! ममता बॅनर्जी यांच्या याचिकेवर 2 नोव्हेंबरला न्यायालयाचा निर्णय

By

Published : Oct 19, 2022, 5:21 PM IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( West Bengal CM Mamata Banerjee ) विरोधात राष्ट्रगातीचा अवमान केल्याप्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश शिवडी न्यायालयाने दिल्यानंतर या विरोधात मुंबई सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या ममता बॅनर्जी यांच्या याचिकेवर 2 नोव्हेंबर रोजी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालय निर्णय देणार ( Mamata Banerjee disrespect national anthem ) आहे.

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( West Bengal CM Mamata Banerjee ) विरोधात राष्ट्रगातीचा अवमान केल्याप्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश शिवडी न्यायालयाने दिल्यानंतर या विरोधात मुंबई सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या ममता बॅनर्जी यांच्या याचिकेवर 2 नोव्हेंबर रोजी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालय निर्णय देणार ( Mamata Banerjee disrespect national anthem ) आहे.

ममता बॅनर्जीयांच्या विरोधात गुन्हा :ममता बॅनर्जी यांनी मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये आयोजित एका कार्यक्रमांमध्ये कार्यक्रम संपल्यानंतर राष्ट्रगीत सुरू असताना राष्ट्रगीताचा अवमान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता भाजपचे मुंबई सचिव विवेकानंद गुप्ता यांनी शिवडी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. या याचीकेनंतर शिवडी न्यायालयाने ममता बॅनर्जीयांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते त्यानंतर ममता बॅनर्जी यांच्यावतीने मुंबई सत्र न्यायालयात शिवडी न्यायालयाच्या निकालाला अहवाल देण्यात आले होते.

आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश : या प्रकरणात दोन्हीही पक्षकारांकडून युक्तिवाद मागील सुनावणीदरम्यान पूर्ण झाला होता. सत्र न्यायालयाने राज्य सरकारला यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते आज राज्य सरकारच्या वतीने सुनावणी होणार होती मात्र काही कारणास्तव आज होऊ शकली नसल्याने दोन नोव्हेंबर रोजी राज्य सरकारची बाजू ऐकून त्याच दिवशी निर्णय देण्याचे आज न्यायाधीश राहुल रोकडे यांनी निश्चित केले आहे.

कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीताचा अपमान : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काही दिवसापूर्वी मुंबईतील कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी ममता बॅनर्जी विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यामागणीकरिता मुंबईतील भाजप कार्यकर्ते यांनी शिवडी दंडाधिकारी कोर्टात याचिका दाखल ( incidence happened during the event ) केली होती. या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने ममता बॅनर्जी यांना 2 मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते त्याविरोधात ममता बॅनर्जी यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली यावर ममता बॅनर्जी यांना मुंबई सत्र न्यायालयाने शिवडी दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देत ममता बॅनर्जी यांना दिलासा दिला होता.

भाजपची कारवाईची मागणी :पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं मुंबईत 1 डिसेंबर 2021 रोजी सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रगीताचा अपमान आणि अनादर केल्याबद्दल ममता बॅनर्जी यांच्या विरोधात राष्ट्र गीताचा अपमान केल्या प्रकरणी कोर्टा समोर आईपीसी कलम 156 (3) अंतर्गत गुन्हा दाखल करून चौकशी करण्यासंदर्भात आदेश देण्याची मागणी करणारी याचिका भारतीय जनता पार्टीचे मुंबई सचिव विवेकानंद गुप्ता यांनी दाखल केली ( BJP demands action ) होती.

काय आहे प्रकरण : ममता बॅनर्जी या मुंबईच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात खुर्चीवर बसलेल्या असतानाच राष्ट्रगीताला सुरुवात केली. चार-पाच ओळी गायल्यानंतर त्या थांबल्या असं तक्रारीत म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांच्या या कार्यक्रमानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या या कृतीवरून टीका केली. ममता बॅनर्जी यांनी खुर्चीवर बसूनच राष्ट्रगीताला सुरुवात केली. त्यानंतर त्या जागेवरून उठल्या. त्यांनी चार ते पाच ओळी गायल्यानंतर थांबल्या. मुख्यमंत्र्यांनी बंगालच्या संस्कृतीचा अपमान केला आहे. राष्ट्रगीताचा अपमान केला तसेच संपूर्ण देशाचाही अपमान केला असल्याचे म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details