महाराष्ट्र

maharashtra

गर्भवती पत्नीच्या पोटावर मुंबईतील फौजदाराने मारली लाथ, महिलेचा झाला गर्भपात

By

Published : Sep 4, 2021, 7:22 PM IST

मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या फौजदाराने गर्भवती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या पोटार लाथ मारली. यामुळे तिचा गर्भपात झाला आहे. याप्रकरणी पीडित पत्नीच्या तक्रारीवरुन सोलापुरातील विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर- मुंबई येथील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका फौजदाराने आपल्या गर्भवती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या पोटावर लाथ मारली. यामुळे त्या महिलेचा गर्भपात झाला आहे. तसेच त्याचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला असून दिराने विनयभंग केला असल्याची तक्रार सोलापुरातील विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. कायद्याच्या रक्षकानेच असे कृत्य केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

चरित्र्याचा संशय घेत फौजदाराने केला छळ

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, संशयीत आरोपीसह पीडित महिलेचे 2020 मध्ये कुर्डवाडी येथे विवाह झाला होता. लग्नानंतर आरोपीने आपल्या पत्नीस व आपल्या कुटुंबियांना घेऊन मुंबई येथे राहावयास गेला होता. दोन महिने व्यवस्थित राहिल्यानंतर संशयीत आरोपी फौजदार हा आपल्या पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊ लागला. काही महिन्यानंतर पीडिता गर्भवती राहिल्यानंतर पोटातील बाळ माझे नाही, तुझे कोणा दुसऱ्यासोबत अनैतिक संबंध आहेत, असे म्हणत मानसिक त्रास देऊ लागला. तसेच कुटुंबातील इतर सदस्यही पीडित विवाहीतेस किरकोळ कारणासाठी त्रास देत होते. पोटातील हे मूल माझे नाही, असा आरोप करत संशयित आरोपीने आपल्या पत्नीच्या पोटावर जोराची लाथ मारली. त्यामुळे तिचे गर्भ पोटातच ठार झाले.

दिराच्या व्यवसायासाठी माहेरहून पाच लाख रुपयांची मागणी तसेच दिराने केला विनयभंग

मुंबईच्या फौजदाराच्या भावानेही पीडित विवाहितेचा छळ करत विनयभंग केला आहे. पीडित विवाहितेला माहेरी जाऊन व्यवसायासाठी 5 लाख रुपये घेऊन ये, असा तगादा लावला होता. तसेच पीडित विवाहितेस माहेरच्या लोकांनी 2020 साली लग्नात 14 तोळे सोन्याचे दागिने दिले होते. ते सर्व दागिने मुंबईच्या फौजदाराने व त्याच्या कुटुंबियांनी ठेवून घेतले आहे, अशी तक्रार पीडितेने विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिली आहे. तक्रार नोंदवून घेण्यासाठी पोलिसांनी दोन महिन्यांचा कालावधी लावला, असा आरोपही पीडितेने केला आहे. प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ करत आहेत.

हेही वाचा -तुमचे नाव सुशीलकुमार आहे का..? मिळेल फ्री पेट्रोल, पण सोलापूरला जावे लागेल!

ABOUT THE AUTHOR

...view details