महाराष्ट्र

maharashtra

Bhaskar Jadhav : तिकडे तर भाजप अन् राष्ट्रवादी एकत्र! आता शिंदे गटाने तत्वनिष्ठ हिंदुत्व जगाला दाखवावे -जाधव

By

Published : Mar 9, 2023, 5:30 PM IST

राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जात उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडल्याचा आरोप भाजप आणि शिंदे गटाने केला आहे. आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस नागालँडमध्ये सत्तेसाठी एकत्र आले आहेत. शिंदे गटाने आता सत्तेतून बाहेर पडून त्यांचे तत्वनिष्ठ आणि हिंदुत्व जगाला दाखवून द्यावे, असे थेट आव्हान ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटाला दिले आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा केल्याने भाजपने हिंदुत्व सोडलं का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav

मुंबई :राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली. उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत गेले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचारांपासून उद्धव ठाकरेंनी फारकत घेतल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. शिंदे गटाकडून सतत उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्व विचारसरणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला सत्तेत येण्यासाठी पाठिंबा जाहीर केला. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी यावरून शिंदे गटाला त्यावरून आता खिंडीत पकडले आहे.

अजित पवार यांना चांगलेच ऐकवले : अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा दुसऱ्या दिवशी विधानसभेत शिंदे गटाचे आमदार व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी, नागालँडमध्ये परिवर्तन झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी यावर हरकत घेतली. त्यानंतर तो मुद्दा विधानसभेत मोठ्या प्रमाणात गाजला. यावेळी यांची चर्चेची मागणीही अध्यक्षानी फेटाळून लावली. त्यानंतर भास्कर जाधव यांनी यावर प्रसारमाध्यमांकडे भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान, या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांसह प्रामुख्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांना चांगलेच ऐकवले.

भाजप नेत्यांनी हिंदुत्व सोडल्याचा आवई उठवली : नागालँडमध्ये भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेस गेली आहे. परंतु, तिथे भाजपचा मुख्यमंत्री नाही. मात्र, महाराष्ट्रात ज्या 40 आमदारांनी फुटून सत्तेसाठी भाजपसोबत गेले, त्यांना माझा सवाल आहे. भाजपने नागालँडमध्ये हिंदुत्व सोडलं का? उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत आघाडी केल्यावर भाजप नेत्यांनी हिंदुत्व सोडल्याचा आवई उठवली होती. शिंदे गटानेही हिंदुत्व सोडल्याचा आरोप केला होता.

नागालँडमधील सत्तेतून भाजप बाहेर पडणार का? : आता नागालँडमध्ये राष्ट्रवादी सत्तेत सामील झाली आहे. शिंदे गट आता सत्तेतून बाहेर पडणार का? असा सवाल भास्कर जाधव यांनी विचारला. शिंदे गटाने आता सत्तेतून बाहेर पडून आपले तत्त्व आणि हिंदुत्व जगाला दाखवून द्यावे, असे अवाहानही जाधव यांनी केले आहे. तसेच, भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसचे वावडे आहे. त्यामुळे नागालँडमधील सत्तेतून भाजप बाहेर पडणार का? असा प्रश्नही जाधव यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा :Schools Uniforms Free : आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत; राज्य सरकारची मोठी घोषणा

ABOUT THE AUTHOR

...view details