महाराष्ट्र

maharashtra

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या

By

Published : Nov 14, 2022, 1:54 PM IST

Updated : Nov 14, 2022, 11:00 PM IST

माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh ) यांच्या जामीन अर्जावर आजही सुनावणी झाली नाही. अनिल देशमुख यांनी सीबीआय प्रकरणात जामिनासाठी अर्ज केला होता. या प्रकरणात 24 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आजही सुनावणी नाही
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आजही सुनावणी नाही

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh ) यांच्या अजूनही अडचणी वाढत आहेत. न्यायालयीन कोठडीतूनच त्यांना अजून काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आजही सुनावणी झाली नाही. अनिल देशमुख यांनी सीबीआय प्रकरणात जामिनासाठी अर्ज केला होता. या प्रकरणात 24 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

पुढील सुनावणी या तारखेला - विशेष सीबीआय न्यायालयाच्या जामीन नाकारल्याच्या विरोधात देशमुख यांनी उच्च न्यायालयात अपिल दाखल केले आहे. न्यायमूर्ती एस. के. शिंदे यांनी दाखल घेत या अपिलावर 24 नोव्हेंबरला सुनावणी घेण्यात येणार असल्याचे सांगितले. देशमुख यांच्या अपिलावर न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी वैयक्तिक कारणास्तव सुनावणीला असमर्थता दर्शविली. त्यानंतर ॲड. अनिकेत निकम यांनी आज दुपारी न्यायमूर्ती एस. के. शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले. याची दखल घेत न्यायालयाने सुनावणी 24 नोव्हेंबरला निश्चित केली आहे.

काय आहे प्रकरण? :मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली होती. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृह मध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत.

Last Updated :Nov 14, 2022, 11:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details