महाराष्ट्र

maharashtra

Babil Khan : वडिलांचे कपडे घालून मुंबई विमानतळावर दिसला इरफान खानचा मुलगा बाबिल खान

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2023, 9:53 PM IST

Babil Khan: दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खान त्याच्या वडिलांची पॅन्ट घालून विमानतळावर स्पॉट झालाय. यावेळी त्यानं पापाराझींशी संवाद साधलाय.

Babil Khan
Babil Khan

मुंबई Babil Khan : चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेता दिवंगत इरफान खानवर आजही त्यांचे चाहते खूप प्रेम करतात. दरम्यान इरफान खान यांचा मुलगा बाबिल खान हा त्याच्या साधेपणासाठी खूप चर्चेत असतो. बाबिल सोशल मीडियावर खूप देखील सक्रिय आहे. बाबिल अनेकदा चाहत्यांशी, पापाराझीसोंबत प्रेमानं बोलताना दिसतो. त्याच्यासोबत अनेकदा चाहतेसुद्धा सुंदर पोस्ट शेअर करतात. आता बाबलची फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यानं या फोटोमध्ये वडील इरफान खानची पँट घातलेली आहे. इतकेच नाही तर व्हिडिओमध्ये बाबिल पापाराझींना हृदयस्पर्शी गोष्टी सांगताना दिसत आहे.

बाबिल खान मुंबई वितमातळावर स्पॉट :बाबिल खान हा नुकताच मुंबई वितमातळावर स्पॉट झाला. या व्हिडिओमध्ये तो पापाराझींना बोलताना दिसत आहे. बाबिल खानचं पापाराझींनी त्याच्या लूकसाठी कौतुक केलय. त्यानंतर तो त्यांना सांगतो, की ही बाबांची पॅन्ट आहेत. एवढंच नाही, तर लवकरच मी तुम्हांला अभिमान वाटेल असंही काहीतरी नक्कीच करेल. आता बाबिल खानच्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर अनेकजण प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्यानं निळ्या रंगाच्या पँटसह निळ्या-पांढर्‍या प्रिंटचा शर्ट परिधान केला आहे. बाबांच्या कूल आउटफिटसोबतच त्यानं टोपी आणि चष्मा घालून आपला लूक पूर्ण केला. या लूकमध्ये तो खूप खास दिसत आहे.

'द रेल्वे मेन' दिसणार बाबिल खान : बाबिल खानची 'द रेल्वे मेन' ही मालिका 18 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर येणार आहे. या वेब सिरीजमध्ये आर. माधवन, के. के मेनन, दिव्येंदु शर्मा, बाबिल खान हे प्रमुख भूमिकेत आहेत. थरारक वेब सिरीज 'द रेल्वे मेन'च्या निर्मात्यांनी मोशन पोस्टरची झलक शेअर केली आहे. या पोस्टरमध्ये तिघांनीही चेहऱ्याला कापड बांधलं आहे. बॉलिवूडचे प्रतिभावान कलाकार आर. माधवन, के. के मेनन, दिव्येंदू, बाबिल खानचं पोस्टर शेअर करत निर्मात्यांनी लिहिलंय, दुःखांच्या काळात मानवतेच्या लढ्याची कहाणी आहे. सत्यकथेवर आधारित असलेली ही मालिका 18 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर झळकणार आहे!

हेही वाचा :

  1. Rhea Chakraborty : सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीनं व्हिडिओ पोस्ट करून शेअर केला तुरुंगातील अनुभव...
  2. Kangana Ranaut : कंगना राणौतनं 'तेजस' रिलीजपूर्वी घेतलं रामलल्लाचं दर्शन
  3. Bigg Boss 17 : ईशा मालवीयचा एक्स बॉयफ्रेंड बिग बॉस 17मध्ये असतानाच कथित बॉयफ्रेंडची होणार एन्ट्री?

ABOUT THE AUTHOR

...view details