महाराष्ट्र

maharashtra

सुमित्रा महाजन यांच्यावर कायदेशीर कारवाई करा; अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी

By

Published : Apr 19, 2020, 10:47 PM IST

माजी लोकसभा अध्यक्ष आणि भाजपा नेत्या सुमित्रा महाजन यांनी कोरोना संकटापासून बचाव करण्यासाठी सोमवारी सकाळी साडेदहा वाजता महामृत्युंजय मंत्र जप करावा, असे वक्तव्य केले होते. महाजन यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केली आहे.

sumitra mahajan
सुमित्रा महाजन

मुंबई - माजी लोकसभा अध्यक्ष आणि भाजपा नेत्या सुमित्रा महाजन यांनी कोरोना संकटापासून बचाव करण्यासाठी सोमवारी सकाळी साडेदहा वाजता महामृत्युंजय मंत्र जप करावा, असे वक्तव्य केले होते. महाजन यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केली आहे. तसेच या वक्तव्याचा निषेधही समितीकडून करण्यात आला आहे.

अविनाश पाटील, कार्याध्यक्ष अंनिस

सुमित्रा महाजन यांनी अहील्या उत्सव समितीच्या माध्यमातून अर्ध्या तासासाठी महामृत्युंजय मंत्र हा जप करावा असे आवाहन केले होते. त्यांनी सांगितले होते की आज आपल्यासाठी डॉक्टर, मेडिकल स्टाफ, पोलीस लढाई करत आहेत. अशावेळी आपण घरी बसून एक काम करू शकतो ते म्हणजे यावेळी त्यांच्या रक्षणासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. त्यांचा असा व्हिडिओ त्यांचा प्रसारीत होत आहे. या व्हिडिओनंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

"महाजन यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. लोकसभेच्या अध्यक्ष राहिलेल्या भारतीय संविधानाने ज्यांना या देशातल्या सर्वोच्च सभागृहात अध्यक्षपदाची संधी दिली. त्यांचे वक्तव्य वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विसंगत आहे. त्या भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्या पक्षाचे नेते असणारे आणि देशाच्या सर्वोच्च पदावर पंतप्रधान असणाऱ्या नरेंद्र मोदीजींनी याबद्दल खुलासा करणे अपेक्षित आहे. वक्तव्यामुळे महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायद्याचे उल्लंघन झालेले आहे. त्याबद्दल कारवाई केली जावी. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने याबद्दल दखल घेऊन याविषयी याचिका दाखल करून घ्यावी. अशा वक्तव्यामुळे सर्वसामान्य माणसांची दिशाभूल होते."

-अविनाश पाटील (कार्याध्यक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन समिती)

ABOUT THE AUTHOR

...view details