महाराष्ट्र

maharashtra

Mahaparinirvan Din 2022: महापरिनिर्वाण दिनानिमित्त निवाऱ्यासह 5 लाख अनुयायांच्या जेवणाची व्यवस्था

By

Published : Dec 6, 2022, 3:27 PM IST

Mahaparinirvan Din 2022: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई पोलिस, महानगरपालिका, रेल्वे, वाहतूक पोलिस यांची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवारी सकाळपासूनच बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत.

Mahaparinirvan Din 2022
Mahaparinirvan Din 2022

मुंबई:डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी राज्यातूनच नाहीतर, देशभरातून लाखो अनुयायी मुंबईतील दादर येथे असलेल्या चैत्यभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. यावर्षीही मोठ्या प्रमाणात देशभरातून अनुयायी 5 डिसेंबर पासूनच चैत्यभूमी येथे जमायला सुरुवात झाली होती.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त निवाऱ्यासह 5 लाख अनुयायांच्या जेवणाची व्यवस्था

अनुयायांना भोजन:डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांची भोजनाची व्यवस्था यावेळी देखील खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. चार ते पाच दिवसा आधीपासूनच मुख्यमंत्र्यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या प्रत्येक अनुयायांना भोजन मिळेल, याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते. देशाच्या अगदी कानाकोपऱ्यातून दलित समाजासह सर्वच जाती धर्मातील जनता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असते. अशावेळी त्या अनुयायांच्या 2 दिवस भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

भोजनाच्या तयारीला २०० आचारी:महापरिनिर्वाण दिनानिमित्त पाच आणि सहा डिसेंबर या दोन दिवसात जवळपास पाच लाख किंवा त्यापेक्षाही अधिक आणि मुंबई येण्याची शक्यता आहे. त्या सर्व अनुयायांना भोजन पाणी याची व्यवस्था करण्यात आली आहे मात्र यासोबतच प्रत्येक अनुयायांना बसून व्यवस्थित जेवण करता येईल याचीही काळजी घेण्यात आली आहे. भोजनासाठी जवळपास 60 कोलम तांदूळ वापरण्यात आला असून जवळपास पंधरा टन भाज्या आणण्यात आले आहेत.

अडीशे कर्मचारी काम करत आहे: यामध्ये मोठ्या प्रमाणात फ्लॉवर, मटार, कांदा, बटाटा, फरसबी, टोमॅटो आहेत. अनुयायांच्या भोजन व्यवस्थेसाठी जवळपास 200 आचारी काम करत असून वाढते आणि सफाई कर्मचारी म्हणून अडीशे कर्मचारी काम करत आहेत. अनुयायांसाठी 2 प्रकारचे पुलाव भात बनवण्यात आले आहेत. यासोबतच रायता लोणचं हे देखील जेवणासाठी दिलं जात आहे. प्रत्येक अनुयायासाठी वेगळी पाण्याची बाटली जेवणासोबत दिली जाते.

स्वच्छतेचे देखील तेवढीच काळजी: जवळपास एकूण 8 लाख पाण्याच्या बाटल्या आणण्यात आले आहेत. भोजनानंतर पत्रावळी तसेच बाटल्यांपासून होणारा कचरा थेट गाडीत भरून विल्हेवाट लावण्यासाठी नेला जातो. त्यामुळे भोजन व्यवस्था करताना स्वच्छतेचे देखील तेवढीच काळजी घेण्यात आली आहे. आज रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत भोजन व्यवस्था सुरू राहणार असल्याची माहिती आयोजक राम रेपाळे यांनी ई टिव्ही भारतशी बोलताना दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details