महाराष्ट्र

maharashtra

Cruise Drug Case : कोऱ्या कागदावर सह्या घेतले असल्याचा समीर वानखेडेंवर आरोप; पंच सोनू म्हस्केंकडून प्रतिज्ञापत्र दाखल

By

Published : Nov 26, 2021, 4:08 PM IST

Updated : Nov 26, 2021, 4:53 PM IST

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मंत्री नवाब मलिक ( Minister Nawab Malik ) त्यांच्याकडून रोज नवनवीन आरोप करण्यात येत होते. आता मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणातील पंच सोनू म्हस्के यांनी समीर वानखेडे यांच्याविरोधात मुंबईच्या विशेष न्यायालयात गंभीर आरोप करत प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रकरणातील दुसरा पंचाच्या एनसीबीने कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचा आरोप केला आहे.

sameer wankhede
समीर वानखेडे

मुंबई -एनसीबीचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे ( NCB Officer Sameer Wankhede ) यांनी मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणातील ( Cruise Drug Case Mumbai ) पंच सोनू म्हस्के यांची कोऱ्या कागदावर सही घेतली असा आरोप त्यांनी केला. याबाबत त्यांनी विशेष न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले.

एनडीपीएस कायद्यांतर्गत शपथपत्र दाखल

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मंत्री नवाब मलिक ( Minister Nawab Malik ) त्यांच्याकडून रोज नवनवीन आरोप करण्यात येत होते. आता मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणातील पंच सोनू म्हस्के यांनी समीर वानखेडे यांच्याविरोधात मुंबईच्या विशेष न्यायालयात गंभीर आरोप करत प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रकरणातील दुसरा पंचाच्या एनसीबीने कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचा आरोप केला आहे. पंच सोनू म्हस्के याने एनडीपीएस कायद्यांतर्गत विशेष न्यायालयासमोर शपथपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये त्याने एनसीबीवर आरोप केले आहेत. खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची आणि अटक करण्याची धमकी देऊन हिंदी भाषेतील चार कागदपत्र आणि काही कोऱ्या कागदांवर सह्या करण्यास भाग पाडले, असा आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचा -26/11 Mumbai Attack : कसाबचा फोन जर मिळाला असता तर निश्चित त्याचा फायदा झाला असता - उज्ज्वल निकम

आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना अटक केल्यानंतर ५ ऑक्टोबरला याच प्रकरणाशी संबंधित एनसीबीने आचित कुमारच्या घरावर छापेमारी करण्यात आली होती. त्याच्या घरातून अंमली पदार्थ मिळाल्याचा दावा एनसीबीने केला होता. आचितच्या अटकेनंतर, अॅडव्होकेट अश्विन थूल यांनी पंचनामा प्रक्रियेदरम्यान अनियमितता आणि एनसीबी अधिकार्‍यांनी आचितला बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप केला होता.

Last Updated :Nov 26, 2021, 4:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details