महाराष्ट्र

maharashtra

26/11 Mumbai Attack ला 14 वर्ष पूर्ण, राजकीय नेत्यांनी शहीदांना वाहिली श्रद्धांजली

By

Published : Nov 26, 2022, 10:57 AM IST

26/11 Mumbai Attack ला 14 वर्ष पूर्ण, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 14 वर्षांपूर्वी मुंबईवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांशी लढताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे.

26/11 Mumbai Attack
26/11 Mumbai Attack

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी शनिवारी 14 वर्षांपूर्वी मुंबईवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांशी लढताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे.

त्यांनी दक्षिण मुंबईतील पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारातील हुतात्मा स्मारकावर श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis, मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) रजनीश सेठ, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आदी अधिकारी उपस्थित होते. तसेच नोव्हेंबर 2008 च्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांनीही शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे.

26 नोव्हेंबर 2008 रोजी, 10 पाकिस्तानी दहशतवादी सागरी मार्गाने आले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार करून 18 सुरक्षा कर्मचार्‍यांसह 166 जणांना ठार केले आणि अनेकांना जखमी केले आणि कोट्यवधींच्या मालमत्तेचे नुकसान केले. दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे, लष्कराचे मेजर संदीप उन्नीकृष्णन, मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय साळसकर यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला होता.

हा हल्ला २६ नोव्हेंबरला सुरू झाला आणि २९ नोव्हेंबरपर्यंत चालला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ओबेरॉय ट्रायडेंट, ताजमहाल पॅलेस आणि टॉवर, लिओपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरिमन हाऊस ज्यू कम्युनिटी सेंटर ही काही ठिकाणे दहशतवाद्यांनी लक्ष्य केली होती. अजमल कसाब हा एकमेव दहशतवादी होता, जो जिवंत पकडला गेला होता. ४ वर्षांनंतर 21 नोव्हेंबर 2012 रोजी त्याला फाशी देण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details