मुंबई :अकरावी ऑनलाइन प्रक्रियेमध्ये प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयाला आपला संस्थात्मक कोटा, अल्पसंख्यांक कोटा, विविध प्रकारचा कोटा जाहीर करावा लागतो. पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये ज्यांनी अल्पसंख्याक कोटा घोषित केलेले आहे. त्यात ख्रिश्चन अल्पसंख्यांक शिक्षण संस्थांमध्ये कला शाखेत या वर्षी 81.6 टक्के इतका कट ऑफ तर मागील वर्षी 83.6 टक्के इतका कट ऑफ होता. विज्ञान शाखेत अल्पसंख्यांक शिक्षण संस्थेचा कट ऑफ मागील वर्षी 78.8 टक्के तर यंदा तो 78 टक्के आहे. म्हणजे फारसा फरक झालेला नाही. कला शाखेच्या तुलनेत विज्ञानाच्या कट ऑफची टक्केवारी देखील कमी दिसते.
यावर्षीचा कट ऑफ : यासंदर्भात मुंबईतील एका कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अल्पसंख्यांक कोट्यामध्ये मागच्या वर्षी 78.7 टक्के इतके कट ऑफ होता. यंदा त्यात घसरण होऊन 76.6 टक्के इतका झाला आले. मात्र गेल्यावर्षी कॉमर्स संदर्भातील कट ऑफ 70 टक्के इतका होता, यंदा त्यात वाढ होवून 78 टक्क्यांपर्यंत कट ऑफ पोहोचला आहे. या संदर्भात शिक्षक भारतीचे नेते ईटीव्हीसोबत संवाद करताना म्हणाले की, यंदा दहावीचा निकाल लागला. त्यामुळे प्रवेश जरा उशिरा सुरू झालेले आहे. कट ऑफ कमी होतो, वाढतो हे दर वर्षी थोड्याफार फरकाने होत असते. आता पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. सर्व गुणवत्ता यादी जाहीर झाली की, संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.