महाराष्ट्र

maharashtra

15 तासांत अपहरणकर्त्याच्या मुसक्या आवळल्या ; लातूर पोलिसांची कारवाई

By

Published : Oct 30, 2020, 6:28 AM IST

निलंगा शहरातून दोन लहान मुलींना पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा डाव फसला होता. मात्र गुन्हेगार पळून जाण्यात यशस्वी झाला. निलंगा पोलिसांनी दोन पथक तात्काळ रवाना करून 15 तासांत या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

latur crime
15 तासांत अपहरणकर्त्याच्या मुसक्या आवळल्या ; लातूर पोलिसांची कारवाई

लातूर - निलंगा शहरातून दोन लहान मुलींना पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा डाव फसला होता. मात्र गुन्हेगार पळून जाण्यात यशस्वी झाला. निलंगा पोलिसांनी दोन पथक तात्काळ रवाना करून 15 तासांत या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

15 तासांत अपहरणकर्त्याच्या मुसक्या आवळल्या ; लातूर पोलिसांची कारवाई

निलंगा येथे पालीवर राहणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींच्या अपहरणाचा कट उधळला आहे. बँक कॉलनी परिसरात पालीवर राहून उदरनिर्वाह करणाऱ्या तनमोर शिंदे आणि बालबाई शिंदे या दाम्पत्याला मधू (वय 7 वर्षे) आणि प्यारी (वय 5 वर्षे) या मुली आहेत. त्या दोघीही सायंकाळच्या वेळी खेळत असताना रिक्षातून आलेल्या एका व्यक्तीने त्यांना 'खाऊ देतो', असे सांगत रिक्षात बसवले; आणि हैद्राबादच्या मार्गाने रिक्षा पळवली.

भयभीत झालेल्या मुलींनी आक्रोश केला. त्यावेळी या मार्गाने जात असलेले माजी पंचायत समिती सदस्य मुरलीधर अंचूळे यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी मुलींची सुटका केली. मात्र आरोपी रिक्षेसह पळून गेला. याबाबत निलंगा पोलिसांत तकार देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ दोन पथकं रवाना करत रिक्षाचालकाला शोधायला सुरुवात केली.

यानंतर अवघ्या पंधरा तासांत गौसपाक हूजूर शेख (वय २८ वर्षे) यास अटक करण्यात आली आहे. त्याने या मुलीचे अपहरण का केले, याचा तपास पोलीस अद्याप करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details