महाराष्ट्र

maharashtra

वलांडी शिवारात ड्रायव्हरचा दगडाने ठेचून खून; आरोपी अद्याप फरार

By

Published : Jun 17, 2021, 10:09 PM IST

driver murdered Valandi area

देवणी तालुक्यातील वलांडी शेतशिवारात एका पिकअप ड्रायव्हरचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. बालाजी शेषराव बनसोडे पाटील, असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

लातूर - देवणी तालुक्यातील वलांडी शेतशिवारात एका पिकअप ड्रायव्हरचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. बालाजी शेषराव बनसोडे पाटील, असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

हेही वाचा -राष्ट्रीय तपास यंत्रणेने लातूरमधून दोघांना घेतले ताब्यात, कारण अद्याप गुलदस्त्यात

यासंदर्भात देवणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बालाजी शेषराव बनसोडे पाटील हे मुळचे मौजे बिहारीपूर (ता. मुखेड जि. नांदेड) येथील रहिवासी आहेत. पण, सध्या ते उदगीर शहरातील बिदर रोड परिसरात राहत होते. मागील 6-7 वर्षांपासून त्यांनी 'उदयगीरी मल्टी सर्व्हिसेस' नावाने आपला गाड्यांचा व्यवसाय सुरू केला होता. बनसोडे हे 15 जून रोजी उदगीरहून निलंग्याला गेले होते. निलंग्यातील काम संपवून ते उदगीरकडे निघाले होते. रात्री 7-8 वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपला भाऊ राजेश बनसोडे यास फोन करून उदगीरकडे येत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांचा फोन बंदच होता. सकाळी जवळपास नऊ वाजण्याच्या सुमारास सोमनाथ उमाटे यांच्या शेतशिवारात बालाजी शेषराव बनसोडे पाटील यांचा मृतदेह आढळला.

मृतकाची ओळख पटू नये म्हणून डोक्यावर, तोंडावर दगडाने ठेचून चेहरा विद्रुप करण्यात आला आहे. खून केल्यानंतर आरोपी पिकअप व्हॅन, कागदपत्र, मोबाईल घेवून फरार झाला आहे. मृतदेहाच्या जवळ पडलेल्या व्हिजीटींग कार्डवरून देवणी पोलिसांना मृतकाची ओळख पटली आहे.

बालाजी बनसोडे पाटील यांचा भाऊ राजेश बनसोडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरनं. 184/2021, कलम-302, 201 भा.दंं.वि अन्वये देवणी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहेत.

घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, निलंग्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश कोल्हे यांनी घटनास्थळाला भेट देवून आवश्यक सूूचना दिल्या. पुढील तपास देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सी.एस. कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रंजित काथवटे, विनायक कांबळे, राजपाल साळुंके, सरफराज गोलंदाज, दबडवार हे विशेष पथक करीत आहे.

हेही वाचा -शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण, चौघांना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details