महाराष्ट्र

maharashtra

'आम्हीच खरे ओबीसी' म्हणत निलंग्यात अठरापगड जातींचे धरणे आंदोलन

By

Published : Oct 5, 2020, 5:27 PM IST

देशात ओबीसींची संख्या ही ५२ टक्के असून त्यांना आरक्षण मात्र १९ टक्के आहे. ओबीसीमध्ये एकूण ३८५ जाती असून, ते आज कोणत्या परिस्थितीत जगत आहेत याबाबत धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आपआपले व्यवसाय व त्याचे साहित्य घेऊन पारंपारिक पद्धतीने देखावा करण्यात आला.

अठरापगड समाज आंदोलन
अठरापगड समाज आंदोलन

लातूर- ओबीसींच्या आरक्षणात इतर जाती समुहाचा समावेश करू नये, आम्हीच खरे ओबीसी, असे म्हणत आज निलंग्यात अठरापगड समाजाने पारंपरिक वेशात धरणे आंदोलन केले. इतर समाजाच्या लोकांना आमच्या हक्काच्या आरक्षणात स्थान देऊ नये, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अठरापगड समाजाने दिला.

आंदोलनातील दृष्य

या आंदोलनात मांग, गारोडी, कैकाडी सलाजितवाले, माळी, परिट, वंजारी, सुतार आवलार, शिंपी, न्हावी, बागवान, सिकलकरी, गोंधळी, घिसाडी, मसनजोगी, वैदू, सुतार पिंजारी इत्यादी अठरापगड समाजातील महिला व पुरूष सहभागी झाले होते.

प्रमुख मागण्या..

ओबीसींचा बॅकलाग भरण्यात यावा, ओबीसी आर्थिक विकास महामंडळास १ हजार ५०० कोटीचा निधी तत्काळ देण्यात यावा, राज्यातील महात्मा फुले विकास महामंडळ, अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, वसंतराव नाईक विकास महामंडळ यांना शासनाने भरघोस निधी द्यावा, एस.सी, एस.टी, ओबीसी विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावी व ती पूर्ववत चालू करावी, एस.सी, एस.टी, ओबीसी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत पदोन्नती देण्यात यावी, राज्यातील विविध क्षेत्रात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हाज्योती मार्फत आर्थिक मदत/फेलोशिप देण्यात यावी, नॉन क्रिमीलियरची मर्यादा २० लाख करण्यात यावी, ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, महाराष्ट्रातील जिल्हानिहाय नोकरभरती मधील ओबीसी आरक्षणाचा कोटा पूर्णतः भरण्यात यावा. या मागण्यात आहेत.

त्याचबरोबर, देशात ओबीसींची संख्या ही ५२ टक्के असून त्यांना आरक्षण मात्र १९ टक्के आहे. ओबीसीमध्ये एकूण ३८५ जाती असून, ते आज कोणत्या परिस्थितीत जगत आहेत याबाबत धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आपआपले व्यवसाय व त्याचे साहित्य घेऊन पारंपारिक पद्धतीने देखावा करण्यात आला.

हेही वाचा-कृषी कायदा : शेतकऱ्यांना मिळणार पैसा, काँग्रेसकडे मुद्दाच नसल्याने विरोध- खासदार दानवे

ABOUT THE AUTHOR

...view details