महाराष्ट्र

maharashtra

Youth Brutally Beaten: तरुणासोबत बसलेली अल्पवयीन मुलगी रडत असल्यानं जमावाचा झाला गैरसमज; तरुणाला बेदम मारहाण

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 13, 2023, 9:16 PM IST

Youth Brutally Beaten : एका अल्पवयीन मुलीसोबत फिरणं तरुणाला चांगलचं महागात पडलं. (Youth beaten on suspicion) जमावानं या तरुणाला जाब विचारला असता त्यांच्यात बाचाबाची झाली. (Youth beaten in Kolhapur) यानंतर जमावानं घटनेकडं संशयाच्या नजरेनं पाहून तरुणाला बेदम मारहाण केली. हे बघून ती मुलगी बेशुद्ध पडली. अखेर पोलिसांनी मध्यस्ती करून जमावाला शांत केलं. तरुणावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जमावाकडून करण्यात आली.

Muslim Youth Brutally Beaten
तरुणाला मारहाण

कोल्हापूरYouth Brutally Beaten:अल्पवयीन मुलीला सोबत घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला कोल्हापुरातील रंकाळा तलावाजवळील अंबाई टॅंक परिसरात जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना आज (सोमवारी) घडली. जमावाच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहं. या प्रकारामुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

संशय आल्यानं जमावाने विचारला जाब :कोल्हापुरातील अंबाई जलतरण तलावानजीक अल्पवयीन मुलीला घेऊन एक तरुण फिरायला आला होता. या तरुणासोबत परिसरातील युवकांचा शाब्दिक वाद झाला. जमलेल्या युवकांना हा प्रकार वेगळाच असल्याची शंका आल्यानं तत्काळ हा प्रकार सामाजिक कार्यकर्ता दीपक देसाई यांना फोनवरून सांगितला गेला. देसाई यांनी याबाबतची माहिती जुना राजवाडा पोलिसांना कळवली. यानंतर जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव आपल्या कर्मचाऱ्यांसह या ठिकाणी दाखल झाले.

गुन्हा दाखल करण्याची मागणी :तलावाशेजारी तरुण आणि अल्पवयीन मुलगी बसलेली आढळले; परंतु, ती मुलगी वारंवार रडत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर जमलेल्या तरुणांनी याबाबत तरुणाला जाब विचारला. यामुळे जमाव आणि तरुणात शाब्दिक बाचाबाची झाली. अखेर जमावाला समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं तरुणाला मारहाण करण्यात आली. यात तरुण गंभीर जखमी झाला तर अल्पवयीन मुलगी बेशुद्ध पडली. पोलिसांनी दोघांनाही उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केलं आहे. जमावाकडून संशयित तरुणावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे; मात्र याबाबतचा तपास पोलीस करत असून यानंतरच कायदेशीर कारवाई केली जाईल.

रंकाळा परिसरात गस्त वाढवण्याची मागणी :सध्या शाळा, महाविद्यालयांना दिवाळीच्या सलग सुट्ट्या असल्यानं रंकाळा तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात प्रेमी युगुल दिवसभर रेंगाळत असतात. दिवसाढवळ्या या ठिकाणी प्रेमी युगुलांचे अश्लील चाळे सुरू असतात, अशी माहिती स्थानिकांनी दिली. निर्भया पथक आणि पोलिसांनी या ठिकाणी गस्त वाढवावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा:

  1. Solapur Crime News: सोलापूरमध्ये लव जिहादचा संशयावरून महाविद्यालयीन तरुणाला मारहाण; एका संशयितास अटक
  2. Gopichand Padalkar On Love Jihad: पुण्यातील दोन प्रकरणांमध्ये लव्ह जिहाद...गोपीचंद पडळकर यांचा दावा, मुख्यमंत्र्यांची घेणार भेट
  3. Pankaja Munde On Love Jihad : पंकजा मुंडे म्हणाल्या, 'लव्ह जिहाद चुकीचे, पण..'

ABOUT THE AUTHOR

...view details