महाराष्ट्र

maharashtra

Unnatural Sex With Student : संस्थाचालकानं विद्यार्थ्याला तेल लावायला बोलवलं अन्....; संस्थाचालकाला अटक

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2023, 5:40 PM IST

Unnatural Sex With Student : शाहूवाडी तालुक्यातील एका गावात 15 वर्षीय विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक लैंगिक कृत्य केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली आहे.

Unnatural Sex With Student
Unnatural Sex With Student

महेंद्र पंडित यांची प्रतिक्रिया

कोल्हापूरUnnatural Sex With Student :कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सैन्य अकदमीच्या अध्यक्षानंच 15 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक लैंगिक कृत्य केल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शाहूवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर चव्हाण (नाव बदलं आहे) असं या निवासी सैनिक शाळेच्या संस्था चालकाचं नाव आहे. त्यानं विद्यार्थ्याला पायाला मालिश करण्यासाठी खोलीत बोलावून घेतलं होतं. तिथं विद्यार्थ्यासोबत त्यानं जबरदस्तीनं अनैसर्गिक लैंगिक कृत्य केल्‍याचं विद्यार्थ्यानं तक्रारीत म्हटलं आहे.

विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृत्य :शाहूवाडी तालुक्यातील एका गावात संशयित आरोपी ज्ञानेश्वर चव्हाण (नाव बदलेलं आहे) अध्यक्ष असलेल्या एका करिअर अकादमीत विद्यार्थ्यांना सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण दिलं जातं. यासाठी अनेक विद्यार्थ्यांची इथंच निवासीची व्यवस्था करण्यात आली आहे. 26 ऑगस्ट रोजी संशयित आरोपीनं एका पंधरा वर्षीय विद्यार्थ्याला रात्रीच्या सुमारास पायाला मालिश करण्यासाठी आपल्या खोलीत बोलावून घेतलं होतं. पायाचं मालिश करून झाल्यानंतर विद्यार्थ्याला रूम मध्येच त्यानं झोपण्यास सांगितलं. त्यानंतर विद्यार्थ्यासोबत त्यानं अनैसर्गिक कृत्य केलं असा आरोप विद्यार्थ्यानं केलाय.

ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा :संशयित आरोपीनं पीडित 15 वर्षीय विद्यार्थ्यावर जबरदस्ती करत अनैसर्गिक लैंगिक कृत्य केल्यानंतर कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळं घाबरलेल्या विद्यार्थ्यानं तक्रार दिली नव्हती. मात्र, अखेर 4 ऑक्टोंबर रोजी रात्री उशिरा विद्यार्थ्यानं शाहूवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यामुळं आरोपीवर कलम 377, बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार तसंच ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. संशयित आरोपीला शाहूवाडी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी जयकुमार सूर्यवंशी अधिक तपास करत असल्याचं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. Police Raped Lady Police : पिस्तुलचा धाक दाखवून पोलिसाचा महिला पोलिसावर वारंवार अत्याचार
  2. Nashik Sex Racket News : नाशिकमध्ये छुप्या सेक्स रॅकेटचा धुमाकूळ, आठ महिन्यात 50 पीडित महिलांची सुटका, 15 जणांना अटक
  3. Suspicious of wifes character: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीकडून मुलीची डीएनए चाचणी, गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details