महाराष्ट्र

maharashtra

Jatyant Patil Vs Raj : पवारांवर बोलल्या शिवाय त्यांना टी आर पी मिळत नाही, मनसेसुध्दा भाजपची बी टीम - जयंत पाटील

By

Published : Apr 3, 2022, 7:25 AM IST

शरद पवार साहेबांवर बोलल्या शिवाय त्यांना टी आर पी मिळत नाही (They don't get TRP without talking about Pawar) यामुळे अश्या विजत असलेल्या माणसाबद्दल मी जास्त बोलणार नाही. राज ठाकरेंची मनसे आणि एमआयएम यासारखे पक्ष हे भाजपची बी टीम (even MNS, BJP's B team) असूनरा ज्याच्या राजकारणातील त्यांचं महत्व जवळपास संपलेले आहे. त्यामुळे याला फारस महत्त्व द्यायला नको असे सांगत जलसंपदामंत्री जयंत पाटील (Minister Jayant Patil) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (MNS president Raj Thackeray) टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

Jayant Patil
जयंत पाटील

कोल्हापूर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांनी पाडवा मेळाव्यात महाविकास आघाडी वर जोरदार टीका केली. या टीकेला जलसंपदामंत्री जयंत पाटील (Minister Jayant Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. विधानसभा सभेत त्यांना कोणतेच स्थान नाही, 2019 च्या अगोदर लाव रे तो व्हिडिओ म्हणत मोदींविरोधात बोलत होते आता ते पलटी मारून बसले आहेत. जनता हे सगळे पाहत आहेत असे सांगताना त्यांनी मनसे आणि एम आय एम पक्ष हे भाजपची बी टीम आहे असा टोला लगावला आहे.

भाजप एक नंबरचा पक्ष असून शिवसेना हा दोन नंबरचा आहे तर राष्ट्रवादी हा तीन नंबरचा असून देखील तीन नंबरचा पक्ष हा पहिल्या दोन पक्षांना फिरवत आहे अशी टीका राज ठाकरे यांनी मेळाव्यात केली. यावर जयंत पाटील म्हणालेकी, शरद पवार यांच्यावर बोलल्या शिवाय त्यांना टीआरपी भेटत नाही म्हणून ते शरद पवार यांच्यावर बोलत असतात जिलेटीन कांड्यानचा शोध अद्याप लागला नाही या त्यांच्या वक्तव्यास आम्ही सहमत असून त्याचा शोध लागला पाहिजे.सध्या हा तपास केंद्रीय यंत्रणांकडे गेला असून एनआयएने तपास करायला हवा.

एवढे महिने गेले तरी अद्याप तपास लागला नाही हे आश्‍चर्यकारक आहे.यामुळे या सगळ्यात राज ठाकरे एकच सत्य बोलले आहेत असे त्यांनी म्हटले आहे.तसेच मुंबई महापालिकेत निवडणुकीत शिवसेनेची मत खाण्याचा प्रयत्न ते करत आहेत. भाजप आणि राज ठाकरे यांची अंतर्गत रित्या सेटिंग झाली आहे हे सर्वानाच माहीत आहे. लाव रे तो व्हिडिओ', म्हणणारे एवढ्या लवकर पलटले कसे असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. तर राज ठाकरे यांचे भाषण मी अद्याप ऐकलेला नाही आणि ऐकणार सुद्धा नाही असेही त्यांनी असे स्पष्ट केले.

हेही पहा : Jayant Patil On Raj Thackeray : राज ठाकरेंचं भाषण ऐकले नाही.. संध्याकाळी जाऊन सुद्धा ऐकणार नाही : जयंत पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details