Jayant Patil On Raj Thackeray : राज ठाकरेंचं भाषण ऐकले नाही.. संध्याकाळी जाऊन सुद्धा ऐकणार नाही : जयंत पाटील

By

Published : Apr 2, 2022, 11:02 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

thumbnail

कोल्हापूर : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथे पाडवा मेळावा ( MNS Gudhipadwa Melawa ) घेत महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली ( Raj Thackeray Criticized MVA ) आहे. भाजप एक नंबरचा पक्ष असून, शिवसेना हा दोन नंबरचा आहे. तर राष्ट्रवादी हा तीन नंबरचा असूनदेखील तीन नंबरचा पक्ष हा पहिल्या दोन पक्षांना कंट्रोल करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याला प्रत्युत्तर देताना कोल्हापुरात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज ठाकरेंना सवाल केला ( Jayant Patil Criticized Raj Thackeray ) आहे. राज ठाकरेंची मनसे आणि एमआयएम यासारखे पक्ष हे भाजपची बी टीम असल्याचे त्यांनी म्हटले ( MNS AIMIM B Team Of BJP ) आहे. तसेच 'लाव रे तो व्हिडिओ', म्हणणारे एवढ्या लवकर पलटले कसे असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. शिवाय शरद पवार यांच्यावर बोलल्याशिवाय त्यांना टीआरपी भेटणार नाही. म्हणून ते शरद पवार यांच्यावर बोलत असल्याचे देखील म्हटले आहे. राज ठाकरे यांचं भाषण कार्यक्रमात असल्यामुळे ऐकले नसून संध्याकाळी जाऊन सुद्धा ऐकणार नाही, असे ते म्हणाले आहेत. तसेच विझत निघालेल्या माणसावर मी जास्त बोलणार नाही. मात्र, संपूर्ण भाषणात जिलेटिन काड्यांचा अद्याप शोध लागला नाही. तो लागला पाहिजे, या त्यांच्या मतावर मी सहमत असून, आमची भूमिका तीच आहे असे ते म्हणाले. तसेच सेनेच्या नेतृत्वात आमचे तीन पक्ष एकत्र येऊन स्थापन झालेले हे सरकार चांगले सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.