महाराष्ट्र

maharashtra

स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या चोरट्याच्या मुसक्या, 24 वाहने जप्त

By

Published : Jun 1, 2021, 10:13 PM IST

कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एका दुचाकी चोराला अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल 24 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.

जप्त मुद्देमालासह पोलीस पथक
जप्त मुद्देमालासह पोलीस पथक

कोल्हापूर -शहरातील विविध भागांतील मोटारसायकल चोरणाऱ्या चोरट्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. रणजीत रवींद्र गुरव (वय 45 वर्षे, रा. पद्माराजे हौसिंग सोसायटी, उजळाईवाडी, कोल्हापूर), असे या चोरट्याने नाव आहे. त्यांच्याकडून एकूण 24 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून त्याच्याकडून सुमारे 7 लाख 20 हजार किमतीच्या 24 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली.

असा लावला सापळा

गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर शहरामध्ये विविध ठिकाणी मोटारसायकल चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. त्यानुसार पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मोटारसायकल चोरीच्या ठिकाणापासून सर्व सीसीटीव्ही चेक करण्याबाबतच्या सूचनाही दिल्या होत्या. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून याबाबत तपास सुरू होते. दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सापळा लावून संशयित आरोपी रणजीत रवींद्र गुरव याला टेंबलाईवाडी येथील उड्डाणपुलाखाली गाडी विकण्यासाठी आल्यानंतर ताब्यात घेतले. त्याच्याकडील चोरीची दुचाकी जप्त केली.

त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता शहरासह गोकुळ शिरगाव परिसरातील एकूण 24 मोटारसायकली चोरी केल्याची त्याने कबल केले. त्यानुसार त्याच्याकडील एकूण 7 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या 24 मोटारसायकली हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

हेही वाचा -नियम जैसे थे!, पण कोल्हापुरात नागरिकांची गर्दी कायम

ABOUT THE AUTHOR

...view details