महाराष्ट्र

maharashtra

Kolhapur Rain Update: राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला; भोगावती नदीत विसर्ग सुरू; पंचगंगेची पाणी पातळी वाढणार

By

Published : Jul 26, 2023, 11:21 AM IST

कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रांमध्ये मागील १२ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा आज उघडला आहे. त्यामुळे भोगावती नदीत विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढणार आहे.

Kolhapur rain update
राधानगरी धरणातून विसर्ग सुरू

राधानगरी धरणातून विसर्ग सुरू

कोल्हापूर :कोल्हापूर धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. राधानगरी धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाचा पहिला स्वयंचलित दरवाजा उघडला आहे. आज सकाळी सव्वा आठच्या सुमारास धरणाचा सहा नंबरचा दरवाजा उघडला आहे. धरणातील एक दरवाज्यातून 1428 क्यूसेक आणि पाॅवर हाऊसमधून 1400 क्यूसेक असा एकुण 2828 क्यूसेक सुरु आहे. राधानगरी धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा खुला :पंचगंगा नदीची पाणी पातळी 40 फुट 4 इंचावर पोहचली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्हा व शहर परिसरात पावसाची संथ गतीने रिपरिप सुरू आहे. मात्र होत असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील सर्व धरणे भरले आहेत. राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा खुला झाल्यामुळे हा विसर्ग सध्या भोगावती नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने त्या क्षेत्रातील नागरिकांना प्रापंचिक साहित्यासह स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्या आहेत.


पूर परिस्थितीमुळे पंचगंगा रुग्णालय तात्पुरते बंद :महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत श्री पंचगंगा रुग्णालय कार्यरत आहे. मागील दोनवेळच्या पूराचा अनुभव पाहता तसेच जिल्ह्यामध्ये संततधार पावसामुळे यंदाही शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. शुक्रवार पेठ येथील महापालिकेचे श्री पंचगंगा रुग्णालय हे पूर प्रभावित क्षेत्रामध्ये येते. त्यामुळे संभाव्य पूर परिस्थितीचा विचार करुन श्री पंचगंगा रुग्णालय तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले आहे.

26 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट :दरम्यान, हवामान खात्याकडून कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दोन्ही जिल्ह्यांसाठी 26 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे, सांगली जिल्ह्यासाठी ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. पूरग्रस्त परिस्थितीमुळे अनेक रस्ते वाहतूकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत. अनेक ठिकाणी नागरिक पाण्यातून धोकादायक पद्धतीने वाहतूक करत आहे.

हेही वाचा :

  1. Kolhapur Rain Update: पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली; धोका पातळीकडे वाटचाल, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आदेश
  2. Heavy Rainfall in Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता; जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर
  3. Kolhapur Rain Update : पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर; पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट

ABOUT THE AUTHOR

...view details