महाराष्ट्र

maharashtra

वर्षाच्या शेवटच्या दिवशी कोल्हापुरात कचराकुंडीत सापडलं एक दिवसाचं स्त्री जातीचं अर्भक

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 31, 2023, 6:14 PM IST

Female Infant Found: कोल्हापुरातील कसबा बावडा येथील गजबजलेल्या वस्तीत एका पेट्रोल पंपाच्या समोर रस्त्याच्या कडेला एक दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. (Kolhapur News) यामुळे परिसरात एकच खळबळ माजली. (Kasba Bawda Area) हे अर्भक कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर फेकले होते. यानंतर स्वच्छता कर्मचाऱ्यांनी मानवता दाखवत त्याला स्वच्छ कापडात गुंडाळले आणि लगेच याची माहिती पोलीस कर्मचाऱ्यांना दिली.

Female Infant Found
एक दिवसाचं स्त्री जातीचं अर्भक

कोल्हापूरFemale Infant Found: कोल्हापुरात सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नियोजन सुरू आहे. असे असताना यास कोल्हापुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (Baby On Garbage) कोल्हापुरातील कसबा बावडा येथील गजबजलेल्या वस्तीत एका पेट्रोल पंपाच्या समोर रस्त्याच्या कडेला एक दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक टाकून दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आज सकाळी (kolhapur baby in dustbin) महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना हे अर्भक कचऱ्यात पडल्याचे दिसून आल्यानंतर तर का वरिष्ठांना कळवत या अर्भकला सेवा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


कचऱ्याच्या ढिगारावर फेकले अर्भक:याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कोल्हापुरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या कसबा बावडा येथे श्रीराम सेवा संस्थेचे पेट्रोल पंप आहे. याच पेट्रोल पंपाच्या समोर उघड्यावर कचरा कोंडाळ असून परिसरातील नागरिक येथे कचरा टाकतात. यामुळे आज सकाळी साडेआठच्या सुमारास कोल्हापूर महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी कचरा उचलण्यासाठी येथे आले होते.

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळे वाचले बाळ:उघड्या कोंडाळ्यातील पडलेला कचरा खोऱ्याने एकत्रित करत असताना कचरात लहान बाळाचा रडण्याचा आवाज कर्मचाऱ्यांनी ऐकला. मात्र एखादी खेळणी आहे असे समजून स्वच्छता कर्मचारी कचरा गोळा करण्यात व्यस्त झाले. मात्र पुन्हा बाळाचा रडण्याचा आवाज आल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांनी जवळ जाऊन पाहिले. यावेळी कचऱ्यामध्ये एका कापडात गुंडाळून एक दिवसाचं स्त्री जातीचं अर्भक टाकलेलं निदर्शनास आलं. यानंतर स्वच्छता कर्मचाऱ्यांनी त्वरित याची माहिती आरोग्य निरीक्षकांना दिली. तसेच या अर्भकाला दुसऱ्या स्वच्छ कापडामध्ये घेऊन तत्काळ सेवा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले. हे अर्भक रात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत कोणीतरी टाकलं असावं असा अंदाज सध्या लावण्यात येत आहे. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तर पोलिसांनी तत्काळ पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचा:

  1. नवीन वर्षाच्या जल्लोषावर विरजण : मायानगरीत बॉम्बस्फोट घडवण्याची मुंबई पोलिसांना धमकी
  2. सरत्या 2023 वर्षात विविध घडामोडींनी चर्चेत राहिले कोल्हापूर, वाचा काय घडल्या महत्वाच्या घडामोडी
  3. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाणे गुन्हे शाखेकडून रेव्ह पार्टी उद्धवस्त; 100 जण ताब्यात 25 वाहनंही जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details