महाराष्ट्र

maharashtra

जालना : डोळ्यात मिरचीची भुकटी टाकून सहा लाख रुपये लंपास

By

Published : May 15, 2021, 1:02 AM IST

एका चारचाकी वाहनाला 5 अनोळखी व्यक्तींनी अडवून चालकाच्या डोळ्यात मिरचीची भुकटी टाकून 6 लाख रुपये पळविल्याची घटना आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.

jalna Robbery news
जालना : डोळ्यात मिरचीची भुकटी टाकून सहा लाख रुपये लंपास

जालना -सेलूहून परतुरकडे येणाऱ्या एका चारचाकी वाहनाला 5 अनोळखी व्यक्तींनी अडवून चालकाच्या डोळ्यात मिरचीची भुकटी टाकून 6 लाख रुपये पळविल्याची घटना आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

गाडीत ठेवलेले रोख सहा लाख रुपये लंपास -

जालना शहरातील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या आनंद नगर भागात राहणारे कपिल ईश्वरलाल जैस्वाल हे वर्धमान ट्रेडर्स येथे मुनीम म्हणून कार्यरत आहेत. आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जयस्वाल आणि अन्य काही सहकारी सेलूकडून परतूरकडे चार चाकी वाहन क्रमांक एमएच 21 बीएफ 3045 या वाहनाने परतूरकडे येत होते. याच वेळी दुधना धरणाच्या पुलाजवळ अज्ञात पाच आरोपींनी त्यांच्या कारला अडविले आणि आरोपी जवळ असलेल्या लोखंडी रॉडच्या साहाय्याने गाडीच्या काचा फोडल्या. तसेच चालकाच्या डोळ्यात तिखटाची भुकटी टाकून इतरांनाही मारहाण केली. तसेच यावेळी गाडीत ठेवलेले रोख सहा लाख रुपये चोरून नेले. याप्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हेही वाचा - कोरोना महामारीत विविध ठिकाणी साधेपणाने अक्षयतृतीया साजरी, वाचा सविस्तर

ABOUT THE AUTHOR

...view details