महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजेश टोपे यांच्या गाडीवर दगडफेक; हल्ला करणाऱ्यावर कारवाई करा - राजेश टोपे

Rajesh Tope Reaction : अज्ञात लोकांकडून जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दारात आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. या हल्ल्यात राजेश टोपे यांच्या गाडीची समोरची काच फुटली आहे.

Rajesh Tope News
राजेश टोपे यांच्या गाडीवर अज्ञातांनी केली दगडफेक

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 2, 2023, 7:24 PM IST

Updated : Dec 2, 2023, 9:40 PM IST

प्रतिक्रिया देताना राजेश टोपे

जालना Rajesh Tope Reaction : राजेश टोपे यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रणांगणामध्ये जीवघेणा हल्ला झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याविषयी सविस्तर माहिती अशी की, आज जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडणार होती. यासाठी आमदार राजेश टोपे हे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्यालय जालना येथे आले असता, यावेळी पाच ते सहा अज्ञातांनी राजेश टोपे यांच्या गाडीवर दगडफेक करत काळी शाई फेकली. यामध्ये सुदैवाने राजेश टोपे हे जखमी झाले नसले तरी, हा हल्ला भारतीय जनता पार्टीच्या एका गटाने केला असल्याची चर्चा सध्या जिल्हाभरात सुरू झाली आहे.

दगडफेक करणे लोकशाहीला शोभणारे नाही: शनिवारी दुपारी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाच्या आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीदरम्यान आमदार राजेश टोपे हे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयात आले होते. जालना जिल्ह्याचे माजी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्या गाडीवर दगडफेक करून हल्ला केला आहे, हे लोकशाहीला शोभणारे नाही. हल्ला करण्याचे कारण हेच होते की, त्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद पाहिजे होते. पण आम्ही टर्म वाटून घेतली असताना, यावेळेस आमची बारी आहे पुढच्या वेळेस लोणीकर गटाचे किंवा लोणीकर अध्यक्ष होणार होते. यामध्ये माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर हे सुद्धा होते. मात्र एवढं झालेलं असताना सुद्धा हा हल्ला होणं हे लोकशाहीला शोभणारं नाही. त्यामुळं ज्यांनी कोणी हा हल्ला केला असेल, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राजेश टोपे यांनी हल्ला झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.

लोणीकर गटातील कार्यकर्त्यांनी केला हल्ला: आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया पार पडणार होती. यात अध्यक्षपदी राजेश टोपे यांचे बंधू सतिष टोपे तर उपाध्यक्षपदी भागवान जावळे (दानवे गट) यांची निवड झाली. याचाच राग धरून लोणीकर गटातील कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याची चर्चा जोर धरत आहे. घटनेची माहिती मिळताच तत्काळ सदर बाजार पोलीस ठाण्याचे (Sadar Bazar police station) पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र या झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे, जिल्ह्यासह राज्यात चर्चेला उधाण आलं आहे. आता या हल्ल्यामागे कोण आहे, कोणी हल्ला केला हे पोलीस तपासात समोर येणारच आहे. मात्र सध्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

हेही वाचा -

  1. Video : पवार साहेब लाखांचे पोशिंदे; धमकी देणाऱ्याविरोधात कठोर कारवाई व्हावी - राजेश टोपे
  2. Rajesh Tope Reaction ON Rane Tweet : शरद पवार यांच्यावरील केलेले ट्विट ही महाराष्ट्राची सुसंस्कृती नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे
  3. Maharashtra Political Crisis : राजेश टोपेंसह सुनील भुसारा यांनी अजित पवारांची घेतली भेट, मनधरणी की गट बदलला?
Last Updated : Dec 2, 2023, 9:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details