महाराष्ट्र

maharashtra

दलित, भटके विमुक्त, अल्पसंख्याकांवर अन्याय करणाऱ्यांना आरे चे उत्तर कारे ने देऊ - अॅड. रमेशभाई खंडागळे

By

Published : Dec 15, 2021, 10:05 PM IST

दलित, भटके-विमुक्त, अल्पसंख्याक यांच्यावरील अन्याय आणि अत्याचारात वाढ झाली आहे. या घटकांवर अन्याय करणाऱ्या अत्याचाऱ्यांना 'अरे चं उत्तर का रे नं 'देऊ असा सज्जड इशारा दलित पँथरचे नेते अॅड. रमेशभाई खंडागळे यांनी दिला आहे. आज जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर दलित पँथरच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला.

Jalna dalit Panther andolan
Jalna dalit Panther andolan

जालना - दलित, भटके-विमुक्त, अल्पसंख्याक यांच्यावरील अन्याय आणि अत्याचारात वाढ झाली आहे. या घटकांवर अन्याय करणाऱ्या अत्याचाऱ्यांना 'अरे चं उत्तर का रे नं 'देऊ असा सज्जड इशारा दलित पँथरचे नेते अॅड. रमेशभाई खंडागळे यांनी दिला आहे. आज जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर दलित पँथरच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो दलित कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील अंबड चौफुली चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चादरम्यान आंदोलकांनी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशसनाविरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.

दलित पँथरचा जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
दलित, भटके-विमुक्त, अल्पसंख्याक यांच्यावर अलीकडच्या काळात मोठी वाढ झाली आहे. दलितांवर अत्याचार करणाऱ्या अत्याचाऱ्यांना राजकीय संरक्षण दिले जात आहे. त्यामुळे दलित, अल्पसंख्यांक, भटके-विमुक्त यांचा आवाज दबला गेला आहे. आजही हे घटक अन्याय सहन करत असून याबाबत स्थानिक प्रशासनाला जाब विचारण्यासाठी हा भव्य मोर्चा काढण्यात आला. सरकार आणि आरोपी जातीयवादी असून अन्यायग्रस्तांना न्याय मिळेल की नाही, याची शाश्वती नाही. असा आरोप यावेळी दलित पँथरचे नेते अॅड. रमेशभाई खंडागळे यांनी केला. या मोर्चादरम्यान पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चात सहभागी झालेल्या दलित कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्यावर होत असलेला अन्याय प्रशासनासह राज्य सरकार दरबारी पोहचवण्याचा प्रयत्न केला.दरम्यान दलित, अल्पसंख्यांक, भटके-विमुक्त यांच्यावर होत असलेला अन्याय थांबवण्यात यावा. अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करु, असा इशारा अॅड. रमेशभाई खंडागळे यांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details